Amrit Bharat Train: सहरसा ते मुंबईदरम्यान लवकरच अमृत भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सहरसा (बिहार) दरम्यान शुक्रवारपासून म्हणजेच 2 मेपासून नियमित स्वरुपात धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन अमृत भारत ट्रेन दाखल झाली असून दर आठवड्याला ही गाडी चालवण्यात येणार आहे. रविवारपासून या गाडीचे आरक्षण आज तिकिट आरक्षण केंद्र आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे.
अमृत भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात किती स्थानकांवर थांबणार, तिकिट आणि रूट कसे असेल याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. अमृत भारत एक्स्प्रेस महाराष्ट्र ते बिहारदरम्यान धावणार आहे. दर शुक्रवारी दुपारी 12 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून रवाना होईल. त्यानंतर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, मानिकपूर, प्रयागराज, खगडिया, समस्तीपूर, हाजीपूर, पाटलीपुत्र आणि पंडित दीनद्याल उपाध्याय,बक्सर, आरा, आरा, दानापूर, सोनपरू, हाजीपूर, मुजफ्फरपूर, हसनपूर रोड, सलौना येथे थांबा देण्यात आला आहे.
दुपारी 12 वाजता मुंबईहून निघालेली अमृत भारत ट्रेन रविवारी सकाळी 4.20 वाजता सहरसा येथे पोहोचणार आहे. त्यानंतर 38 तासांचा प्रवास करुन सोमवारी दुपारी 3.45 वाजता मुंबईत पोहोचेल. नाशिकरोड येथे सोमवारी दुपारी 12.30 ला येईल. मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) ते सहरसा या 19000 किलोमीटर अंतरासाठी अमृत भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन पूर्णपणे अत्याधुनिकरित्या सुसज्य आहे. या गाडीला 22 बोगी राहणार असून यामध्ये स्लिपर कोच, चेअरकार असणार आहे. या गाडीमध्ये तिकीट दर कमी राहणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. 11095 आणि 11016 या क्रमांकाची अमृत भारत ट्रेन राहाणार असून ती आठवड्यातून एकदा धावणार आहे. सहरसा ते मुंबईकडे येण्यासाठी ३५ तास लागणार आहे, तर मुंबईकडून सहरसाकडे जाण्यासाठी ३८ तास लागणार आहेत.
या ट्रेनमुळं नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार आहे. सहरसा ते मुंबई दरम्यान स्लीपर कोचचे तिकीट 1045 आहे तर पाटलिपूत्र ते मुंबई 945 रुपये तिकीट असणार आहे.