Marathi News> भारत
Advertisement

मुजफ्फरनगर दंगलीच्या प्रत्यक्षदर्शीची गोळ्या घालून हत्या

एनएच - ५८ वर इंदिरा गांधी यांच्या मूर्तीजवळ तीन बाईकस्वारांनी अशफाकवर जवळून गोळ्या झाडल्या

मुजफ्फरनगर दंगलीच्या प्रत्यक्षदर्शीची गोळ्या घालून हत्या

उत्तरप्रदेश : मुजफ्फरनगरच्या खतौली भागात बाईकस्वारांनी मुजफ्फरनगर दंगलीतील प्रत्यक्षदर्शीची गोळ्या घालून हत्या केलीय. एकाच बाईकवर आलेल्या तीन जणांनी ही हत्या केली आणि इतरांना काही कळण्याच्या आधीच घटनास्थळावरून ते पसार झाले. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अशफाक असं या मृताचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये झालेल्या मुजफ्फरनगर दंगलीत अशफाकच्या दोन भावांची हत्या करण्यात आली होती. त्याबद्दल अशफाकनं आठ जणांविरुद्ध रतनपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनीही या तक्रारीवर कारवाई करत हत्याकांडाचा खुलासा करून आरोपींना अटक केली होती. या हत्या प्रकरणात कोर्टात ट्रायल सुरू आहे आणि येत्या २५ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार होती. पण त्याआधीच अशफाकचीही हत्या करण्यात आलीय.

सोमवारी अशफाक एका दुकानावर दूध पोहचवण्यासाठी जात असताना त्याच्यावर हा हल्ला झाला. एनएच - ५८ वर इंदिरा गांधी यांच्या मूर्तीजवळ तीन बाईकस्वारांनी अशफाकवर जवळून गोळ्या झाडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशफाकला तक्रार मागे घेण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज खंगाळून काढत आहेत.

Read More