Marathi News> भारत
Advertisement

भारतातील 'या' नदीत सापडते 24 कॅरेट शुद्ध सोनं; वाळू गाळून श्रीमंत होतात लोक

भारतात एक अशी नदी आहे ज्या नदीच्या पात्रात सोनं सापडते. कोणीही येथे जाऊन नदीतील वाळू गाळून सोनं काढू शकतात. 

भारतातील 'या' नदीत  सापडते 24 कॅरेट शुद्ध सोनं; वाळू गाळून श्रीमंत होतात लोक

Mysterious Subarnarekha River: काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत भारतातून हजारो नद्या वाहतात.  भारतातील नद्या हा फक्त जलस्त्रोत नाही तर यांना पारंपारिक वारसा देखील लाभलेला आहे. प्रत्येक नदीची स्वतःची कहाणी असते. या नद्या धार्मिक, पारंपारिक तसेच वैज्ञानिकदृष्ट्या देखील महत्वाच्या आहेत. भारतात अशीच रहस्यमयी नदी आहे. या नदीत  24 कॅरेट शुद्ध सोनं सापडते. या नदीतील वाळू गाळून लोक श्रीमंत होतात. जाणून घेऊया भारतातील या अनोख्या नदी विषयी.

'सुवर्णरेखा' म्हणजे 'सोन्याची रेषा'.  सोनं सापडणाऱ्या या नदीचे नाव  सुवर्णरेखा असे आहे.  सुवर्णरेखा ही नदी  झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांमधून वाहणारी नदी आहे. कोणत्याही प्राचीन पौराणिक घटनेशी किंवा कथेशी संबंधित नसली तरी, या नदीच्या पाण्यात शुद्ध सोने आहे. तथापि, ही काही नवीन घटना नाही, उलट वर्षानुवर्षे नदीच्या पात्रात सोने आहे. 
या नदीला सोन्याचे भांडार असेही म्हटले जाते. या नदीत सोनं येते कुठून याचे  गूढ अद्याप उलगडलेले नाही. नदीत इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. असा अंदाज आहे की एका महिन्यात नदीतून 60 ते 80 कण बाहेर काढले जातात आणि शास्त्रज्ञ या नैसर्गिक पण विचित्र घटनेचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.

ही नदी झारखंड राज्यातील रत्न गर्भा प्रदेशातून जाते. तिची उपनदी करकरी आणि मुख्य नदी वर्षानुवर्षे सोन्याच्या कणांनी भरलेली आहे. 474 किमी लांबीची ही नदी झारखंडमधील रांचीजवळील नागडी गावातील रानी चुआन येथून उगम पावते. नंतर ती बंगालच्या उपसागरात वाहते आणि ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमधून जाते. असे मानले जाते की नदीच्या सुरुवातीच्या ठिकाणाजवळ असलेल्या रांचीमधील पिस्का गावात प्रथम सोने उत्खनन केले गेले होते, परंतु नंतर नदीच्या पात्रात, प्रामुख्याने वाळूखाली सोन्याचे कण आढळले.

सोने काढण्याची प्रक्रिया वर्षभर सुरू राहते. आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक आदिवासी कामगार या प्रक्रियेत गुंतलेले असतात. ते वाळू गाळून नदीच्या पात्रातून सोने काढतात. पावसाळ्याशिवाय हे काम वर्षभर चालू राहते. सोन्याच्या कणांचा आकार तांदळाच्या दाण्याएवढा मोठा असतो आणि कधीकधी त्यापेक्षाही लहान असतो.
तामार आणि सारंडा प्रदेशात, हे काम पिढ्यानपिढ्या चालू आहे. वेगवेगळ्या आदिवासी समुदायातील लोक वाळू चाळण्याच्या आणि सोने काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहेत. घरातील जवळजवळ प्रत्येक दुसरा व्यक्ती हा नदीतून सोनं काढून आपला उदरनिर्वाह करतो. 

 

Read More