Marathi News> भारत
Advertisement

नौशेरा येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. 

नौशेरा येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

श्रीनगर : कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका गावचे सुपुत्र सैन्यदलातील जवान नायब सुभेदार वालटे सुनील रावसाहेब यांना वीरमरण आले आहे. ते ३८ वर्षांचे होते. जम्मू सीमेवर नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. नायब यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

  

काल नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांशी लढताना, गोळीबारात ते जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. 

 

Read More