Marathi News> भारत
Advertisement

नवज्योत सिंग सिद्धू यांचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा, हे आहे कारण

10 जूनला राहुल गांधींना लिहीलेले पत्र त्यांनी ट्वीट केले. 

नवज्योत सिंग सिद्धू यांचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा, हे आहे कारण

नवी दिल्ली : पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या राज्य मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याऐवजी माजी अध्यक्ष राहुल गांधींकडे हा राजीनामा सुपूर्द केला. तसेच सिद्धू यांनी ट्विटरवर यासंदर्भात घोषणा केली आहे. 10 जूनला राहुल गांधींना लिहीलेले पत्र त्यांनी ट्वीट केले. 

सिद्धू यांनी 10 जुलैलाच राजीनामा दिला होता पण आज त्यांनी आज यासंदर्भात खुलासा केला.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. अमरिंदर सिंह यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याचे खापर नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर फोडले होते. त्यानंतर दोघांमधला तणाव अधिकच वाढला. 

Read More