Marathi News> भारत
Advertisement

देशभरात शिकवणार शिवरायांचा इतिहास; मराठ्यांचा पराक्रमही NCERT च्या अभ्रासक्रमात

NCERT Social Science Textbook: आठवी इयत्तेच्या पुस्तकामध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलांमध्ये औरंगजेब, अकबराबरोबरच मराठ्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

देशभरात शिकवणार शिवरायांचा इतिहास; मराठ्यांचा पराक्रमही NCERT च्या अभ्रासक्रमात

NCERT Social Science Textbook: एनसीईआरटी बोर्डाने इयत्ता आठवीच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मुघल इतिहास नवीन दृष्टिकोनातून मांडण्यात आला आहे. यात सम्राट अकबरला 'निर्दयी पण सहिष्णू' आणि औरंगजेबला 'कठोर धार्मिक शासक' म्हणून चित्रित केले आहे. या पुस्तकात 13 व्या ते 17 व्या शतकातील राजकीय चळवळींचा समावेश करण्यात आला आहे. 

मराठ्यांच्या इतिहासाचाही संदर्भ

बाबर हा 'लोकांची कत्तल करणारा एक क्रूर आणि निर्दयी आक्रमणकर्ता' होता, अकबराची राजवट 'क्रूरता आणि सहिष्णुतेचे मिश्रण' होती, तर औरंगजेबाने मंदिरे आणि गुरुद्वारा उद्ध्वस्त केले, असे वर्णन एनसीआरटीच्या इयत्ता आठवीच्या नवीन सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आले आहे. दिल्ली सल्तनत आणि मुघल काळाची विद्यार्थ्यांना ओळख करून देणाऱ्या या पुस्तकात, त्या काळात ‘धार्मिक असहिष्णुतेच्या अनेक घटना' घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

बदल कोणते?

पुस्तकात दिल्ली सल्तनत व मुघल काळातील धार्मिक असहिष्णुतेची उदाहरणे दिली आहेत. बाबरला क्रूर राजा, तर अकबराचे सहिष्णुता आणि क्रूरतेचे मिश्रण असे वर्णन केले आहे. औरंगजेबाला मंदिरे व गुरुद्वारांचा विध्वंसक असं म्हटलं आहे.

पुस्तकात बदल का केले?

पुस्तकांमध्ये बदल झाल्यानंतर वाद निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी एनसीईआरटीने म्हटले आहे की, 'भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही दोषी ठरवू नये,' म्हणून हे बदल करण्यात आले आहेत. 

गेल्या वर्षीही केले बदल

एनसीईआरटीने गेल्या वर्षी पुस्तकांमध्ये काही बदल केले होते. अभ्यासक्रमात 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' समाविष्ट केले होते. यासोबतच शालेय पुस्तकांमध्ये वीर अब्दुल हमीद यांच्यावरील एक प्रकरण समाविष्ट केले होते.

एनसीईआरटीच्या पुस्तकांमधील धडे आणि माहितीवरुन यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. विरोधकांनी राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर निशाणा साधताना हे शिक्षणाचं भगवीकरण असल्याचा आरोप केला होता. नव्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारतीय इतिहासातील खऱ्या नेतृत्वांना मुलांपर्यंत सरकारचे प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं.

मराठ्यांच्या इतिहासाचाही समावेश

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचे गौरवपूर्ण वर्णन केले आहे. त्यामुळे आता या पुस्तकांच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राबाहेरील मुलांनाही शिकता येणार आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे.

Read More