Marathi News> भारत
Advertisement

Success Story: मोबाईल कव्हर विक्रेता होणार डॉक्टर... दिनक्रम थक्क करणारा, 'ही' व्यक्ती उचलणार सर्व खर्च

Mobile Cover Seller To Doctor: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' या म्हणीचा प्रत्यय नुकत्याच जाहीर झालेल्या नीट यूजीच्या निकालामध्ये पाहायला मिळाला.

Success Story: मोबाईल कव्हर विक्रेता होणार डॉक्टर... दिनक्रम थक्क करणारा, 'ही' व्यक्ती उचलणार सर्व खर्च

Mobile Cover Seller To Doctor: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' अशी मराठीत एक म्हण आहे. या म्हणीचा अर्थ, 'अडचणींवर मात करण्यासाठी कठोर प्रयत्न केले, तर यश नक्की मिळते' असा होतो. झारखंडमधील जमशेदपूर येथील रोहित कुमारने ही म्हण सत्यात आणून दाखवली आहे. फुटपाथवर मोबाइल कव्हर विकणारा हा सर्वसाधारण तरुण देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली नीट यूजी 2025 (NEET UG 2025) यशस्वीपणे उत्तीर्ण झाला आहे. आता तो डॉक्टर होणार आहे. त्याचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे. 

एकच जिद्द होती की...

घरातील अठरा विश्व दारिद्र, साधनांची कमतरता या दोनच गोष्टींनी रोहितची साथ कधीच सोडली नाही. दिवसा दुकानावर बसून पोटापाण्याची व्यवस्था होईल याची काळजी घ्यायची आणि रात्री अभ्यास करायचा असा रोहितचा दिनक्रम! "परिस्थिती कशीही असली तरी डॉक्टर व्हायचं आहे," अशी एकच जिद्द उराशी बाळगून रोहित झटत होता. 

दुकानात काम, पहाटे तीनपर्यंत अभ्यास अन्...

दिवसभर काम करुन घरी पोहचल्यानंतर जेवण झाल्यावर मी लगेच अभ्यासाला बसायचो, असं रोहितने 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत रोहित अभ्यास करायचा. त्यानंतर सकाळी 7 वाजता तो परत मोबाईल कव्हरचं दुकान उघडण्यासाठी हजर असायचा. अत्यावश्यक सुविधा नसतानाही परिस्थितीवर मात करुन आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हवं ते मिळवू शकतो असा विश्वास रोहितने त्याच्याप्रमाणेच संघर्ष करणाऱ्या लाखो तरुणांच्या मनात निर्माण केला आहे.

देशातून कितवा आला रोहित?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी 14 जून 2025 रोजी अंडरग्रॅज्युएट मेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी अवश्यक असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET UG) 2025 चे निकाल जाहीर केले. हा निकाल जाहीर झाल्यानंतर रोहित आणि त्याच्या कुटुंबियांच्या आनंद गगनात मावेनासा झाला. रोहितने 720 गुणांपैकी 549 गुण मिळवत भारतातून 12 हजार 484 वा क्रमांक पटकावला. 

या व्यक्तीने उचलला रोहितच्या शिक्षणाचा खर्च

'फिजिक्सवाला'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे यांनी रोहित कुमारचा प्रवास आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. आमच्या टीमला रोहितच्या कामगिरीबद्दल समजलं तेव्हा मला असं वाटलं की त्याची ही संघर्ष कथा सर्वांना समजली पाहिजे. अलख पांडे रोहितला भेटण्यासाठी दिल्लीहून झारखंडला आले. ते थेट रोहितच्या मोबाईल कव्हरच्या दुकानावर पोहोचले. अलख पांडे यांनी रोहितच्या घरी जाऊन त्याच्यासोबत स्नेह भोजनाचा आनंद घेतला. रोहितच्या पुढील शिक्षणाची चिंता करु नका, मी त्याचा सर्व खर्च करेन, असा शब्द अलख यांनी रोहितच्या कुटुंबियांना दिला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alakh Pandey (@alakhsir_pw)

टॉप तीनमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी

नीट यूजी 2025 मध्ये यंदा 22 लाख 9 हजार 318 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12 लाख 36 हजार 531 जण प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 7 लाख 22 हजार 462 विद्यार्थिनी आहेत आणि 5 लाख 14 हजार 63 विद्यार्थी आहेत. 6 तृतीय लिंगी उमेदवारही पात्र ठरले आहेत. राजस्थानमधील महेश कुमार या परीक्षेत भारतातून पहिला आला आहे. मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया दुसरा तर महाराष्ट्रातील कृषांग जोशी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Read More