Marathi News> भारत
Advertisement

आश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की माणूस? बकरीने दिला माणसासारख्या कोकराला जन्म, पाहा Video

Goat human like baby : माणसासारख्या दिसणाऱ्या बकरीच्या पिल्लाची सर्वत्र चर्चा.  

आश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की माणूस? बकरीने दिला माणसासारख्या कोकराला जन्म, पाहा Video

Goat human like baby: कुत्र्याच्या पोटी कुत्र्याचं पिल्लू, मांजराच्या पोटी मांजराचं पिल्लू, सिंहाच्या पोटी छावा, वाघाच्या पोटी बछडाच जन्माला येतो हे आपल्याला माहितीच आहे. पण कधी कोणत्या प्राण्याच्या पोटी माणूस जन्माला आल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? हे खरं आहे आणि असं प्रत्यक्षात घडलं देखील आहे. एका बकरीच्या पोटी चक्क माणसासारखं दिसणारं कोकरू जन्माला आलं आहे. (MP New Born Goat Resembling Human)

मध्य प्रदेशातील ( Madhya Pradesh ) विदिशा जिल्ह्यातील सिरोज येथील विदिशा जिल्ह्यात एका बकरीने माणसासारखे दिसणार्‍या कोकराला जन्म दिला आहे.  हे कोकरुचा चेहरा एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्याप्रमाणेच दिसत आहे. यावर पशुवैद्यकीय तज्ज्ञांचं मते, 'हेड डिस्पेप्सिया' या दुर्मिळ आजारामुळे या कोकरुचा असा जन्म झाला आहे. तसेच, अशी पूर्ण वाढ न झालेली पिल्लं जास्त काळ जगत नाहीत.

माणसाप्रमाणे चेहरा असणाऱ्या वेगळ्या बकरीच्या पिल्लाचा जन्म शुक्रवारी झाला आहे. या पिल्लाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी सांगितले की, या बकरीच्या कोकरुची पूर्णपणे वाढ झाली नाही. अशा प्राण्याच्या पिल्लाचं आयुष्य कमी असतं. या बकरीच्या पिल्लाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या बकरीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिलं आहे. या घटनेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. या पिल्लाला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलं आहे की, पूर्ण वाढ झाली नसल्याने या कोकराला तोंडाद्वारे अन्न खाता येत नाही. सध्या इंजेक्शन सिरिंजद्वारे याला दूध पाजावं लागत आहे.  

बकरीच्या पिल्लाचा फोटो व्हायरल

माणसासारख्या चेहऱ्याप्रमाणे दिसणाऱ्या या बकरीच्या पिल्लाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (photo viral) झाला आहे. अनेकांनी याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट आणि शेअर केले आहेत. शिवाय आजूबाजूची गावं आणि जिल्ह्यातील लोकसुद्धा या बकरीच्या कोकरुला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

Read More