Marathi News> भारत
Advertisement

घरात किती लीटर दारू ठेवता येते? 31st December आधी जाणून घ्या कायदा काय सांगतो

New year party अर्थात नव्या वर्षाच्या स्वागताच्या दृष्टीनं तुम्हीही काही बेत आखताय का? तर सर्वप्रथम त्यासाठीचे काही नियम जाणून घ्या.   

घरात किती लीटर दारू ठेवता येते? 31st December आधी जाणून घ्या कायदा काय सांगतो

New year party : (year end) सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सध्या अनेकजण बेत आखताना दिसत आहेत. तुमच्यापैकीसुद्धा कैकजण मित्रमंडळींच्या साथीनं हे बेत आखत असतील. अमुक एका ठिकाणी जाऊन किंवा मग गर्दी टाळण्यासाठीचा पर्याय म्हणून एखाद्याच्या घरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठीचे बेत सध्या मंडळी करत आहेत. या साऱ्यामध्ये काही नियमांकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. 

पार्टी म्हटलं की कल्ला, मद्यपान, खाण्यापिण्याची चंगळ असंच एकंदर चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं. तुम्हीही अशीच एखादी पार्टी आयोजित करणार असाल तर सर्वप्रथम काही नियम जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल आणि रंगाचा बेरंग झाल्यावाचून राहणार नाही. याच नियमांपैकी एक म्हणजे घरी मद्य ठेवण्याची मर्यादात. भारतामध्ये राज्यांनुसार यासंदर्भातील नियम बदलत असून, घरात नेमकं किती मद्य ठेवावं यासाठीची मर्यादा आखून देण्यात आली आहे. 

गोव्यात कोणता नियम?  

पार्टी हब अशी ओळख असणाऱ्या गोव्यामध्ये एखाद्या घरात बिअरच्या 18 बाटल्या एकाच वेळी ठेवण्यास परवानगी आहे. देशी मद्याच्या 24 बाटल्या तुम्ही गोव्यातील घरात ठेवू शकता. (Maharashtra) महाराष्ट्राच्या बाबतीत कायदेशीररित्या तुम्ही मद्याच्या 6 बाटल्या घरात ठेवू शकता. तर, राजस्थानाच IMFL च्या 18 बाटल्या घरात ठेवण्याची परवानगी आहे. (Goa)

पंजाब हरियाणामध्ये कोणता नियम? 

पंजाबमध्ये देशी आणि परदेशी मद्याच्या दोन बाटल्या घरात ठेवण्याची परवानगी आहे. त्याहून जास्त मद्य ठेवल्यास तुम्ही सरकारला दरवर्षी 1000 रुपये देऊन मद्य बाळगण्यासाठीचा रितसर परवाना मिळवू शककता. तर, हरियाणामध्ये घरात तुम्ही देशी मद्याच्या 6 आणि परदेशी मद्याच्या 18 बाटल्या ठेवू शकता. याहून जास्त मद्य ठेवम्यासाठी तुम्हाला 200 रुपये प्रती महिना इतकी रक्कम घेऊन शासकीय परवाना घेणं बंधनकारक असेल. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : कोस्टल रोडवरून प्रवास करण्याआधील टोलचा भुर्दंड; लोकार्पणाआधीच मोठा निर्णय?

दिल्लीमध्ये घरात किती प्रमाणात मद्य ठेवता येतं? 

दिल्ली उच्च न्यायालयानं आखून दिलेल्या नियमांनुसार 25 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणारी व्यक्ती घरात 9 लीटर व्हिस्की, रम किंवा वोडका ठेवू शकते. शिवाय 18 लीटर बिअर किंवा वाईनही ठेवण्याची परवानगी दिल्ली प्रशासनाकडून मिळते. 

Read More