Marathi News> भारत
Advertisement

नव्या नवरीने सासरच्या मंडळींना दिलं सरबत आणि मग...

लग्न म्हटलं तर दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. हाच लग्न सोहळा मोठ्या थाटातमाटात केला जातो. सर्वत्र आनंदाचं वातावरणं असतं. मात्र...

नव्या नवरीने सासरच्या मंडळींना दिलं सरबत आणि मग...

नवी दिल्ली : लग्न म्हटलं तर दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. हाच लग्न सोहळा मोठ्या थाटातमाटात केला जातो. सर्वत्र आनंदाचं वातावरणं असतं. मात्र, फिरोजाबाद येथे एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...

फिरोजाबाद जिल्ह्यातील राजा का ताल या गावात राहणाऱ्या राकेश कुमार यांचा मुलगा अंकुशचा विवाह सोहळा ११ फेब्रुवारी रोजी पार पडला. त्यानंतर २२ एप्रिल रोजी अंकुश आपली पत्नी रिता हिला माहेरहून सासरी घेऊन आला. मात्र, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार...

एके दिवशी नववधू रिताने आपल्या सासरच्या मंडळींना रात्री १० वाजण्याच्या सुमारास सरबत पिण्यास दिलं. सरबत प्यायल्यानंतर सर्वच बेशुद्ध झाले. त्यानंतर सकाळी डोळे उघडले तेव्हा त्यांना मोठा झटका बसला. कारण, आपली नवी सून घरातील कपडे, दागिने आणि ३ लाख रुपये घेऊन पसार झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक राकेश कुमार यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी राकेश कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु आहे.

Read More