चंदीगढ : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब (Punjab) सरकारने रात्रीची संचारबंदी (Night curfew) लावण्याच्या निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी १ डिसेंबरपासून लागू करणार असल्याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली. रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांना आणि सोशल डिस्टंन्सिंग न पाळणाऱ्यांना दुप्पटीने दंड भरावा लागणार आहे. त्याचबरोबर १५ डिसेंबरला या निर्बधांचा फेरआढावा ही घेण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी पंजाब सरकारने १ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी लावण्यात येणार आहे. #coronavirus
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 26, 2020
@ashish_jadhao https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/iZIZzjatl0
राजधानी दिल्लीत कोरोना विषाणू प्रादुर्भावची (coronavirus) स्थिती गंभीर दिसून येत आहे. दुसरी लाट आल्याने आता शेजारच्या पंजाब (Punjab) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदीचा (Night curfew) आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या आदेशानुसार १ डिसेंबरपासून पंजाबमधील सर्व विभाग आणि शहरांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात येईल. सोबतच मास्क न वापरणारे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पंजाबमध्येही कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका आहे. यामुळे पंजाब सरकारने कडक धोरण अंवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्रीच्यवेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार रात्री ९.३० वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. तर संचारबंदी रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दुसरीकडे मास्क न वापरणाऱ्यांकडून आता ५०० रुपयांऐवजी १००० रुपये दंडाची वसूली केली जाणार आहे.