मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी इशा अंबानीचा प्री-वेडिंग सोहळा रविवारी उदयपूरमध्ये मोठ्या थाटात पार पडला. यावेळी अंबानी कुटुंबीयांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर ताल धरला. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांनीही आपल्या पत्नीसोबत नृत्य केले. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या कार्यक्रमाला बॉलिवूडच्या तारे-तारकांसह अनेक बड्या असामी उपस्थित होत्या.
नीता अंबानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सोहळ्यातील फोटो व व्हीडिओज शेअर केले आहेत. या कार्यक्रमासाठी भव्य सेट उभारण्यात आला आहे. या स्टेजवर अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांनी डान्स केला. तर ईशाने आनंदसोबत ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटातील ‘मितवा’ या गाण्यावर ताल धरला. येत्या १२ तारखेला आनंद व ईशा विवाहबद्ध होणार आहेत.
WATCH: #MukeshAmbani, #NitaAmbani and others shake a leg at #IshaAmbaniSangeet in Udaipur.
— dna After Hrs (@dnaAfterHrs) December 9, 2018
.
.
.#IshaAmbaniWedding #IshaAmbani #AnandPiramal pic.twitter.com/rqz4aQxItU
या कार्यक्रमाला बॉलिवूडच्या तारे-तारकांसह अनेक बड्या असामी उपस्थित होत्या. कालपासूनच सेलिब्रिटी आणि राजकारणी उदयपूरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिनेता अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, शाहरुख खान, करण जोहर, ए. आर. रहमान, अरजित सिंह, विद्या बालन, जावेद जाफरी, सचिन तेंडुलकर हे सर्वजण या सोहळ्याला उपस्थित आहेत.