Mansarovar Pithoragarh Route Update: कैलास-मानसरोवरचे दर्शन व्हावे अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा असते. पण कैलास मानसरोवरला जाण्यासाठी नेपाळ-चीनची सीमापार करुन जावे लागते. पण आता भारतीयांना कैलास मानसरोवरची यात्रा करणे आता सोप्पे होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. उत्तराखंडच्या पिढोरगड ते नेपाळ-चीन सीमा जोडणाऱ्या रस्त्याचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.
उत्तराखंडच्या पिथौरगढ ते केलास मानसरोवर यात्रा पूर्ण करण्यासाठी आता नेपाळ किंवा चीनला जाण्याची गरज भासणार नाही. पिथौरगढपासून कैलास मानसरोवरला जाण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या नवीन प्रकल्पामुळं भारतीय नागरिक नेपाळ किंवा चीननला न जाता कैलास मानसरोवरची यात्रा करू शकतो. नवीन प्रकल्पामुळं यात्रेचा वेळ आणि प्रवासाचा त्रासदेखील वाचणार आहे.
तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पापा हवामानाच्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. उणे 8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जात असताना अशा परिस्थितीत काम करणे खूप कठीण आहे. या परिस्थितीत वर्षातून फक्त तीन ते चार महिने काम सुरू ठेवू शकतो, असं गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
गडकरी यांनी पुढे म्हटलं आहे की, हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असं मी अश्वस्त करतो. या वर्षी एप्रिलनंतर मी स्वतः प्रकल्पाच्या ठिकाणी जाईन. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. एकदा का हा रस्ता पूर्ण झाल्यावर, हा नेपाळ आणि सिक्कीममधून जाणाऱ्या सध्याच्या मार्गांना बायपास करेल. ज्यामुळे पिथोरागड ते मानसरोवर थेट प्रवास करता येईल. मानसरोवरला जाण्यासाठी 16-17 किमी प्रवास चीनच्या रोड नेटवर्कची गरज भासणार आहे, असंही गडकरींनी म्हटलं आहे.
जेव्हा प्रकल्पाचे बांधकाम चीनपर्यंत जाईल तेव्हा सरकारचे परराष्ट्र मंत्रालया चीनसोबत चर्चा सुरू करेल. एकदा अंतिम स्वरुप आल्यानंतर यात्रेकरुंना नेपाळ किंवा सिक्कीम मार्गे जावे लागणार नाही. यात्रेकरुंना पिथोरागड मार्गे थेट कैलास मानसरोवरला पोहोचू शकतील. या धोरणात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे यात्रेकरूंचा प्रवास लक्षणीयरीत्या सुलभ होईल आणि हिमालयीन प्रदेशात संपर्क वाढेल, असंही गडकरींनी म्हटलं आहे.
कैलास-मानसरोवरची यात्रा आता नेपाळ आणि चीन या दोन देशातून होते. त्यासाठी 15-28 दिवसांचा अवधी लागतो. हा मार्ग अत्यंत कठिण आहे. भूस्खलन आणि अधिक उंचीमुळं यात्रा फक्त शारिरीकरित्या फिट असलेल्या लोकांसाठीच शक्य असते. 1998 मध्ये प्रसिद्धी ओडिसा नृत्यांगना प्रोतिमा बेदीसह 180 पेक्षा अधिक यात्रेकरूंचा भूस्खलनात मृत्यू झाला होता.
उत्तराखंडमध्ये कैलास मानसरोवरसाठी बनवण्यात येणारा मार्ग तीन खंडात विभाजन केले आहे. पहिला खंड पिथोरागड ते तवाघाट 107.6 किमी लांबीचा आहे. दुसरा खंड तवाघाट ते घटियाबगढ पर्यंत 19.5 किमीपर्यंत डबल लेन रस्ता निर्माण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात घाटियाबगढ ते लिपुलेख दर्रापर्यंत 80 किमीपर्यंत पायी मार्ग असणार आहे.