Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक VIDEO! आमदाराने थेट गर्दीत घुसवली कार, 22 लोकांना चिरडलं

निवडणुकीसाठी पाचशे ते सातशे लोक एकत्र जमले होते यावेळी आमदाराने थेट गर्दीत कार घुसवली

धक्कादायक VIDEO! आमदाराने थेट गर्दीत घुसवली कार, 22 लोकांना चिरडलं

भुवनेश्वर : ओडिशाच्या (Odisha) खुर्द जिल्ह्यातील बाणापूर इथं बिजू जनता दलाचे (BJD) आमदार प्रशांत जगदेव यांच्या वाहनाने 22 लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात सात पोलिसांचाही समावेश आहे. 

या घटनेनंतर संतप्त जमावानं आमदार जगदेव यांची चांगलीच धुलाई केली आणि कार पेटवून दिली. बाणापूरमध्ये ब्लॉक अध्यक्षाची निवडणूक सुरू होती. त्याचवेळी 500 ते 700 लोक एकत्र जमले होते. याठिकाणी पोलिसांची तुकडीही तैनात होती. 

मात्र जगमोहन यांनी मागचा पुढचा विचार न करता गर्दीत कार घुसवली. विशेष म्हणजे बिजू जनता दलाचे आमदार जगमोहन यांच्यावर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 13 भाजप कार्यकर्ते आणि 7 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. जखमी आमदाराला आधी तांगी हॉस्पिटल आणि नंतर भुवनेश्वरला नेण्यात आलं.

Read More