Marathi News> भारत
Advertisement

ओमर अब्दुल्लांनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, सोशल मीडियावर ट्रोल

या व्हिडिओत अब्दुल्ला श्रीनगरच्या एका जीम ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआऊट करताना दिसत आहेत. 

ओमर अब्दुल्लांनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, सोशल मीडियावर ट्रोल

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड, विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील फिटनेस चॅलेंज स्वीकारलं... यानंतर त्यांनी आपल्या आवडत्या वर्कआऊटचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओत अब्दुल्ला श्रीनगरच्या एका जीम ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआऊट करताना दिसत आहेत. 

'गुलपनाग यांच्याद्वारे दिलेलं फिटनेस चॅलेंज मी पूर्ण कलंय... यात मला मजा आली' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

परंतु, आपलं वर्कआऊट सोशल मीडियामध्ये शेअर केल्यानंतर मात्र त्यांना ट्रोलर्सनं निशाण्यावर घेतलंय. एस पी गुप्ता नावाच्या एका युझरनं लिहिलंय 'एसी रुममध्ये तीन वेळा टायर उलटवू दाखवणं सोपं आहे.. एखाद्या दिवशी १ बीघा जमीन नांगरून दाखवा'

Read More