Marathi News> भारत
Advertisement

ममता बॅनर्जींना दिल्लीत नेणार - ओमर अब्दुल्ला

भाजपचा विरोध करणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार

ममता बॅनर्जींना दिल्लीत नेणार - ओमर अब्दुल्ला

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांना दिल्लीला नेण्यासाठी आले आहोत असं विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केलंय. जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात सर्वात मोठी आघाडी उभी करण्याबाबत या भेटीदरम्यान चर्चा झाली.

एक विचारधारा असलेल्या पक्षांनी भाजपशी लढा देण्यासाठी हातभार लावला पाहिजे. भाजपचा विरोध करणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचं ओमर यांनी सांगितलं. 

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आणि अल्पसंख्याकांमध्ये असलेल्या भीतीबद्दल ममता यांच्याशी चर्चा केली. २०१९ मध्ये भाजपाला लढा देण्याबाबत सर्वोत्तम प्रयत्न करू, असं ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं. 

Read More