Marathi News> भारत
Advertisement

मगर आणि सुसर भिडले, पाहा पाण्यातील शिकारीचा थरारक व्हिडीओ

जीवघेण्या शिकारीचा थरार तेही पाण्यात... मगर की सुसर कोण जिंकलं पाहा व्हिडीओ 

मगर आणि सुसर भिडले, पाहा पाण्यातील शिकारीचा थरारक व्हिडीओ

मुंबई : वन्य प्राण्यांच्या शिकारीचे थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण चक्क एक आता पाण्यात होत असलेल्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला आहे. मगर आणि सुसर यांच्यातील भांडणाचा हा व्हिडीओ आहे. 

या व्हिडिओमध्ये दुसरी मगर आपल्या शेपटीने पहिल्यावर हल्ला करताना दिसत आहे. दोघांमधील थरारक लढत सुरू होती. नक्की कोण जिंकणार याची उत्सुकता तर नेटकऱ्यांनाही आहे. अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. 

या भांडणात शेवटी कोण जिंकत हे जरी या व्हिडीओमध्ये स्पष्ट होत नसलं तरी दोघंही एकमेकांना कडवी टक्क देत असल्याचं दिसत आहेत. कोणीच पराभव घ्यायला पाहात नाही. दोघांमधील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ही थरारक लढाई पाहून अनेक युजर्स हैराण झाले आहेत. प्राणी आपल्या परिसरावर नेहमी हक्क गाजवत असतात तिथे दुसरा कोणी आल्याचं त्यांना रुचत नाही. आपलं वर्चस्व कमी होऊ नये यासाठी ते कायम लढायला तयार असतात. इथेही काहीसं असंच झाल्याचं दिसत आहे. 

Read More