Marathi News> भारत
Advertisement

पहिल्या दिवशी FB वर मैत्री, दुसऱ्या दिवशी बलात्कार अन् तिसऱ्या दिवशी ब्लॅकमेल; तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

FB वर झाली मैत्री दुसऱ्याच दिवशी 20 वर्षीय नराधमाचा तरुणीवर बलात्कार;  वारंवार केले ब्लॅकमेल

पहिल्या दिवशी FB वर मैत्री, दुसऱ्या दिवशी बलात्कार अन् तिसऱ्या दिवशी ब्लॅकमेल; तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

जयपूर : सोशलमीडियावर पहिल्या दिवस आधी मैत्री, दुसऱ्या दिवशी रेप आणि तिसऱ्या दिवशी अश्लिल पोटो सोशलमीडियावर वायरल करण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राजसमंद शहरात एका तरुणाविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी फेसबुकवर मित्र झालेल्या दोघांनी फोन कॉल, व्हाट्सअप, फेसबुक मॅसेंजरवर रोमॅंटिक चॅट्सला सुरवात केली. रोमान्समध्ये इतके बुडाले की, मौजमस्ती करण्यासाठी एक दुसऱ्यासाठी फोटो - व्हिडिओ काढले.

मस्ती मस्तीत तरुणाने तरुणीसोबत अवैध संबध ठेवले. त्यानंतर तिचे काढलेले अश्लिल फोटो वायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला लागला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी त्यांच्या नात्यात फूट पडली. पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार तसेच ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रार दाखल करीत 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आकाश दमामीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहेत

Read More