Marathi News> भारत
Advertisement

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

पाकिस्तानकडून गुरूवारी सकाळी सुंदरबनी सेक्टरच्या केरी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन  

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

श्रीनगर : देशात होळीचा उत्साह असताना पाकिस्तानकडून पुन्हा एकदा नापाक कृत्य करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील चौक्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सेनेने गुरूवारी सकाळी सुंदरबनी सेक्टरजवळील केरी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. 

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात यश पॉल हा 24 वर्षीय जवान शहीद झाला. पाकिस्तानकडून जानेवारी महिन्यापासून नियंत्रण रेषेवर 100 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 

गुरूवारी जम्मू-काश्मीरमधील बारामूल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह दोन पोलीस जखमी झाले. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील सोपोरमधील प्रमुख चौकात सुरक्षादलाकडून शोधमोहीम सुरु असताना दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. 

Read More