Marathi News> भारत
Advertisement

सायबर भामट्यांची तुमच्या खात्यावर नजर; SBI ने ट्वीट करीत ग्राहकांना दिला इशारा

कोरोनाकाळात ऑनलाईन बँकिंग फ्रॉडमध्ये वाढ झाल्याच्या बाबी समोर येत आहेत.

सायबर भामट्यांची तुमच्या खात्यावर नजर; SBI ने ट्वीट करीत ग्राहकांना दिला इशारा

Online Banking Fraud : कोरोनाकाळात ऑनलाईन बँकिंग फ्रॉडमध्ये वाढ झाल्याच्या बाबी समोर येत आहेत. सायबर चोरांनी आतापर्यंत अनेकांच्या खात्यातून पैशांची चोरी केली आहे.  त्यापार्श्वभूमीवर SBI, PNB, ICICI या बँकांनी आपल्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. 

देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. त्यासंबधीचे एक ट्वीट SBIच्या अधिकृत हॅंडलरवरून करण्यात आले. 'जेव्हा आपण क्यू आर कोड स्कॅन तेव्हा आपल्याला रक्कम मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फ्रॉड क्यूआर कोडला स्कॅन करू नये' असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना फ्रॉड कॉल्सपासून सावध केले आहे. बनावट कॉल्स तसेच एसएमएसच्या मदतीने सायबर चोर तुमच्या अकऊंटमधला पैसा काढू शकतात. त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.

खासगी क्षेत्रातील अग्रणी बँक असलेल्या ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना आपली आर्थिक माहिती कोणालाही न शेअर करण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तिला CVV,पासवर्ड, OTP सांगू नका. 

Read More