Marathi News> भारत
Advertisement

Indian Pakistan Attack : पाकिस्तानी रात्री जात होते अन्... दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय क्षेपणास्त्र; घरात घुसून मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

India Air Strike on Pakistan Viral Video: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. भारताने टेरिरिस्टनच्या नऊ तळांवर हल्ला केला आहे. पीओकेपासून बहावलपूरपर्यंत स्फोट झाले आहेत. विशेष म्हणजे LOC वर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार होत आहे.

Indian Pakistan Attack : पाकिस्तानी रात्री जात होते अन्... दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय क्षेपणास्त्र; घरात घुसून मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

Operation Sindoor India Missile Attack Viral Video: भारतीय सेनाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) लाँच केलं आहे. भारताने दहशतवाद्यांच्या नऊ तळावर स्ट्राइक केलं आहे. Pok ते बहावलपूरपर्यंत हा हल्ला केला आहे. खासकरुन LOC वर दोन्ही बाजूने फायरींग करण्यात आली. या दरम्यान भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाकिस्तानी रात्री घरी जात होते अन्...
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही पाकिस्तानी कारमधून जाताना दिसत आहे. अचानक त्यांच्या समोरच्या रस्त्यावर क्षेपणास्त्र पडल्याच दिसत आहे. सगळं काही धुरकट दिसू लागलं. हा सगळा प्रकार ज्या गाडीसमोर घडला त्यांनी तो रेकॉर्ड केला आहे. अचानक झालेल्या या घटनेने त्यांना धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. 

पाहा व्हिडीओ 


७ ते २० सेकंदांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बहावलपूरपासून मुस्तफाबादपर्यंत दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. इतर काही व्हिडिओंमध्ये लोक म्हणत आहेत, अरे! काय झालं.... व्हिडिओ बनवा.... व्हिडिओ

भारतीय सैन्याची ही कारवाई रात्री १.३० च्या सुमारास करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहेत.

भारतीय हवाई दलाकडून गस्त वाढवली

दरम्यान, सीमेवरून एक अपडेट आली आहे की, भारतीय हवाई दलाने हवाई गस्त वाढवली आहे. दिल्लीत बैठकांचा हा टप्पा सुरूच आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी सुविधांना हात लावण्यात आला नाही, जेणेकरून कारवाईचा खरा उद्देश दहशतवादाचा नायनाट करणे आणि शेजारी देशासोबतचा संघर्ष वाढवू नये याची खात्री करता येईल. भारतातील कमी-अधिक ३०० ठिकाणी होणाऱ्या मॉक ड्रिलच्या काही तास आधी हवाई दलाने हा हल्ला केला.

Read More