Marathi News> भारत
Advertisement

India Pakistan तणावाचा चारधाम यात्रेवर परिणाम; केदारनाथ धाम परिसरात...

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू असल्यामुळं आता त्याचे थेट परिणाम इतरही अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे.   

India Pakistan तणावाचा चारधाम यात्रेवर परिणाम; केदारनाथ धाम परिसरात...

India Pakistan War : दहशतवादी कारवायांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतानं एल्गार पुकारला असून, आता या दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्षानं गंभीर वळण घेतलं आहे. संपूर्ण देशभरात यामुळं तणावाची परिस्थिती असून, धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणांवर सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असणाऱ्या (Chardham Yatra) चारधाम यात्रेवरही याचे परिणाम दिसत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. 

संरक्षणात्या निकषांना केंद्रस्थानी ठेवत त्याची संवेदनशीलता पाहता केदारनाथ मंदिर परिसरात पुरवण्यात येणारी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेश मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात यात्रा परिसरांपासून ते संपूर्ण उत्तराखंडमध्ये सतर्कता बाळगण्याचे निर्देश (Uttarakhand) उत्तराखंड राज्य शासनानं लागू केले आहेत. या निर्देशांमुळं आता हेलि सेवांवर आधारित असणाऱ्या अनेक भाविकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

केदारनाथ मंदिर (Kedarnath Yatra) आणि यात्रामार्गावर होणारी गर्दी पाहता या ठिकाणी विशेष सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येत असून, सर्व यंत्रणा सतर्क असल्याचं स्पष्ट होत आहे. तर, या तीर्थक्षेत्रासह येथे येणाऱ्या पर्यटकांचं हित पाहता इथं ही हेलिसेवा बंद करण्याता निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार नागरी उड्डाण विभागानं यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. 

सायबर हल्ल्यांचा वाढता धोका 

प्रत्यक्ष सशस्त्र हल्लेच नव्हे, तर यादरम्यान सायबर हल्ल्यांचा वाढता धोका पाहता उत्तराखंडमध्ये स्पेशल टास्क फोर्सनं सायबर कमांडे सक्रिय केले असून, एका विशेष पथकाकडून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. हे पथक सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. 

चारधाम यात्रेतही तणावाची स्थिती? 

मे महिन्याच्या सुरुवाचीलाय शास्त्रोक्त पद्धतीनं चारधाम यात्रेची सुरुवात झाली. भाविकांनी सुरुवातीपासूनच या यात्रेसाठी त्यात समाविष्ट असणाऱ्या अनेक मंदिरांमध्ये जमण्यास सुकुवातही केली. दरवर्षी राज्यात या यात्रेच्या अनुषंगानं होणारी गर्दी लक्षात घेता सध्याच्या घडीला खुद्द उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीसुद्धा यात्रामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला. 

Read More