India Pakistan War: पहलगाम हल्ल्याच्या निषेधात भारतानं भारताच्या ऑपरेशन सिंदुरअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर आता थयथयाट करणाऱ्या पाकिस्ताननंही प्रत्युत्तराच्या कारवाईची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध 'ऑपरेशन बुनियान उल मारसूस' सुरू केल्याची घोषणा केली आणि त्याअंतर्गत शत्रू राष्ट्रानं शुक्रवारी रात्री भारतीय सीमेलगतच्या बहुतांश शहरांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचं पाहायला मिळालं.
9 मे 2025 च्या मध्यरात्रीनंतर हरियाणातील सिरसा इथं आभाळात अचानकच लख्ख प्रकाश पाहायला मिळाला आणि त्यामागोमाग स्फोटाचा मओठा आवाज झाला. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, काही सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्ताननं फतेह 1 आणि फतेह 2 अशी क्षेपणास्त्र भारतावर डागल्याचं वृत्त समोर आलं. भारतीय लष्कराकडून यासंदर्भातील अधिकृत वृत्त मात्र अद्यापही प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं जात आहे.
पाकिस्तानने भारतीय वायुसेनेच्या फॉरवर्ड बेस आणि शहरांवर फतेह मालिका बॅलिस्टिक मिसाईल्स डागले. ही कारवाई भारताविरोधातील पाकिस्तानची मोठी वाढती आक्रमकता दर्शवते. भारताने प्रत्युत्तराखातर रावळपिंडीसह पाकिस्तानमधील प्रमुख हवाई तळांवर हल्ले केले. यादरम्यान भारतीय वायुदलाची सर्व मालमत्ता सुरक्षित असल्याची माहिती समोर आली.
भारतातील तीन शहरांवर पाक्स्तानच्या हल्ल्याचा मोठा कट सैन्यदलानं उधघळला. तर तिथं सिरसामध्ये पाकिस्तानी मिसाईल पाडलं. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंवरून असे दिसून येते की भारताने सिरसा येथे भारतीय हवाई क्षेत्रावरून पाकिस्तानचे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र यशस्वीरित्या रोखले आहे. जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकारी सिरसा यांनी रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला.
भारताने पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान केले; नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (शोरकोट) या हवाई तळांवर घुसखोरी केली; परिस्थिती आणखी चिघळली.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि लाहोरसह इतर मोठ्या शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की भारताने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली जी भारतीय हद्दीत पडली. सीमेपलीकडून पाकिस्तानकडून झालेल्या अनेक ड्रोन हल्ल्यांनंतर, भारताने प्रत्युत्तर म्हणून पीओकेच्या नीलम व्हॅली आणि सियालकोटमध्ये जोरदार हल्ला केला.
#WATCH | Parts of a missile seen in Haryana's Sirsa are being retrieved by security personnel.
— ANI (@ANI) May 10, 2025
(Visuals obtained from locals) pic.twitter.com/lzbx2LYXUp
#BigBreaking : हरियाणा के सिरसा में भारत ने गिराई पाकिस्तान की मिसाइल, एयर डिफेंस सिस्टम ने किया तबाह #Sirsa #BreakingNews #OperationSindoor #IndiaPakistanTensions #PakistanAirBase | #ZeeNews @pratyushkkhare pic.twitter.com/I7avQpsh7o
— Zee News (@ZeeNews) May 10, 2025
एस-400, आकाशतीर, एल-70, झू-23 आणि शिल्का यासारख्या उत्कृष्ट हवाई संरक्षण प्रणाली सीमा आकाशावर आपले वर्चस्व कायम ठेवतात; ड्रोन वापरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या नापाक हेतूंना हाणून पाडण्यास भारताला मदत करतात.