Marathi News> भारत
Advertisement

23 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; Operation Sindoor वेळी नेमके कुठे होते PM मोदी?

Operation Sindoor: 1.28 ते 1.51.... पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या 23 मिनिटांमध्ये कुठे होते? पाकिस्तानसाठी कर्नदनकाळ ठरली ती 23 मिनिटं....   

23 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; Operation Sindoor वेळी नेमके कुठे होते PM मोदी?

Operation Sindoor: सीमाभागात सततची घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्ताननं कहर तेव्हा केला जेव्हा जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी निष्पापांवर बेछूट गोळीबार केला. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या याच पाकिस्तानला हल्ल्याची परतफेड करत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं. भारतीय लष्करातील तिन्ही दलांसह प्रामुख्यानं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. 

9 दहशतवादी तळांवर हल्ला करत भारतीय सैन्याच्या या हल्ल्यामध्ये पाकमध्ये लपून बसलेल्या तब्बल 90 हून अधिक दहशकवाद्यांचा खात्मा केल्याचं वृत्त यानंतर समोर आलं. 'ऑपरेशन सिंदूर'वर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी जातीनं लक्ष घातलं. 

रात्रभर मोहिमेचं मॉनिटरींग

मागील काही दिवसांपासून सातत्यानं उत्तस्तरिय बैठका, सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळीसुद्धा पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यावर त्यांनी रात्रभर लक्ष ठेवलं. हल्ल्यात नेमकं काय घडत आहे, याची थेट माहिती ते मिळवत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहत भारताच्या लष्करी कारवाईवर मोदींची देखरेख असल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान कार्यालयातू पंतप्रधान या मोहिमेची माहिती मिळवत सुनियोजित पद्धतीनं कारवाई होत आहे की नाही याची दक्षता बाळगून होते. 

23 मिनिटांत पाकिस्तानला अद्दल घडवली 

6 मे 2025 ची मध्यराच्र उलटून गेल्यानंतर आणि 7 मे 2025 या नव्या दिवसाची सुरुवात होताच मध्यरात्री 1.28 वाजता पाकिस्तानात भारतीय सैन्यानं कारवाई सुरू करत 1.51 वाजता ही मोहिम फत्ते केली. 23 मिनिटांतच पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला. 

शहावल नल्लाह कॅम्प मुजफ्फराबाद

शहावल नल्लाह कॅम्प लष्कर-ए-तोयबाचं दहशतवादी भरती केंद्र
1999-2000 पासून या तळावर दहशतवादी सक्रिय
या दहशतवादी तळावर फायरिंग रेंज, ट्रेनिंग ग्राऊंड
हाफिज सईदकडून इथंच दहशतवादी तरुणांचं ब्रेन वॉशिंग
पाकिस्तानी लष्करानं दिलेली शस्त्रास्त्र आणून इथंच ट्रेनिंग दिलं जातं

मरकज अब्बास कोटली

हाफीज अब्दुल सईद आणि कारी झरार हे दहशतवादी तळ चालवतात
कारी झरारचा दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात थेट सहभाग
याच तळावर जैश-ए-मोहम्मदसाठी पैसा इथंच गोळा केला जातो


शहावल नल्लाह कॅम्प मुजफ्फराबाद

शहावल नल्लाह कॅम्प लष्कर-ए-तोयबाचं दहशतवादी भरती केंद्र
1999-2000 पासून या तळावर दहशतवादी सक्रिय
या दहशतवादी तळावर फायरिंग रेंज, ट्रेनिंग ग्राऊंड
हाफिज सईदकडून इथंच दहशतवादी तरुणांचं ब्रेन वॉशिंग
पाकिस्तानी लष्करानं दिलेली शस्त्रास्त्र आणून इथंच ट्रेनिंग दिलं जातं

Read More