Operation Sindoor Fact Check :जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्लाचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवाद्याविरोधात ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं. या मोहीमेतर्गंत भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही मोहीम भारत सरकारमधील महत्त्वाचे लोकं आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख यांच माहिती होती. पण सध्या सोशल 19 सेकंदचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली होती. काय आहे प्रकरण आणि या व्हिडीओचं सत्य जाणून घेऊयात. (Operation Sindoor information leaked to Pakistan What was the government response to the Congress question Fact Check)
व्हायरल व्हिडीओमधील 19 सेकंदांच्या क्लिपमध्ये एका वृत्तवाहिनीचा लोगो अस्पष्ट दिसतोय. पण यात असा दावा केला जात आहे की, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पत्रकार परिषद घेत आहेत आणि ऑडिओ थोडा विचित्र आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर असे दिसते की देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर काहीतरी बोलत आहेत. जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले आणि ऐकले तर तुम्हाला ऑडिओमध्ये ऐकू येईल की ऑपरेशन सिंदूरबद्दल पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती की, आमचे सैन्य दहशतवादी तळावर हल्ला करणार आहे आणि जसे तुम्ही सॅटेलाइट चित्रांमध्ये पाहिले आहे, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर, केरळ काँग्रेसच्या सत्यापित x हँडलवरून तीच क्लिप शेअर करण्यात आली आणि सरकारकडून उत्तर मागितण्यात आलं आहे.
केरळ काँग्रेसने व्हिडीओ शेअर केला आणि विचारले, 'कृपया आम्हाला सांगा की हा व्हिडीओ एआयने तयार केला आहे का?' हे खरे आहे का? ते आपले परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांनी हे सांगितलं यावर माझा विश्वासच बसत नाही. हे जवळजवळ नोटाबंदीसारखेच आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांना काय होणार आहे हे माहित होते आणि देशातील इतर लोकांना याची कल्पना नव्हती. खरोखरच एक मास्टरस्ट्रोक!
या व्हायरल व्हिडीओची उत्तरे पीआयबी फॅक्ट चेकद्वारे देण्यात आली.
Social media posts quoting EAM @DrSJaishankar are implying that India gave advance information to Pakistan about #OperationSindoor#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 16, 2025
EAM is being misquoted, and he has not made this statement
https://t.co/DQriAgE56e https://t.co/05OiwE3kdV
तथ्य तपासणीत असे सांगण्यात आलं की, परराष्ट्र मंत्री @DrSJaishankar यांच्या हवाल्याने सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये, ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की भारताने पाकिस्तानला #ऑपरेशन सिंदूर बद्दल आगाऊ माहिती दिली होती, त्यात परराष्ट्र मंत्र्यांचे चुकीचे उद्धरण दिलं जात आहे आणि त्यांनी हे विधान दिलेले नाही.