India Pakistan War : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. भारताच्या या ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानला हादरा बसला आणि त्यानंतर या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाककडूनही भारतावर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचा अपयशी प्रयत्न करण्यात आला. याचदरम्यान एकिकडे नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं केंद्राकडून सूचित केलं जात असतानाच, दरम्यानच्या काळात नागरिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यातील सर्वाधिक प्रभावित विभाग म्हणजे हवाई वाहतूक.
भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने देशातील विमानतळं बंद ठेवत तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 9 ते 14 मे 2025 पर्यंत देशातील 32 विमानतळ बंद असतील. तर, दिल्ली आणि मुंबई अंतर्गत 25 हवाई मार्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण काळात विमान कंपन्यांनी पर्यायी मार्गांची योजना आखण्याची सूचना भारतीय विमानतळ प्राधिकरणानं जारी केली आहे.
वरील सर्व विमानतळांवरील नागरी वाहतूक सुविधा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. दरम्यांच्या काळात मुंबई आणि दिल्ली विमान वाहतूकसुद्धा प्रभावित होत असल्यानं अनेक सामान्य नागरिकांना आणि विमान प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
भारत पाक दरम्यान च्या युद्ध जन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इकडे पुणे विमानतळाची सुरक्षा आणखी कडक करण्यात आलीय..प्रवाशांना बारकाईने तपासणी करून आत सोडलं जातंय तसंच व्हीआयपी टर्निमनलची सुरक्षा वाढवली गेलीय..
यासोबतच सीमा भागात जाणारी प्रवासी विमान सेवा कालपासूनच तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
Passenger Advisory issued at 06:00 Hours#DelhiAirport #PassengerAdvisory #DELAdvisory pic.twitter.com/Up5PK6dPhd
— Delhi Airport (@DelhiAirport) May 10, 2025
दिल्ली विमानतळाचे कामकाज सध्या सामान्य आहे. मात्र बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या आदेशानुसार वाढलेल्या सुरक्षा उपायांमुळे, काही उड्डाण वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षा तपासणी चौक्यांवर प्रक्रिया करण्याचा वेळ जास्त असू शकतो.