Marathi News> भारत
Advertisement

22 एप्रिल - मोदी को बता देना, 7 मे- मोदीने बता दिया... सोशल मीडियावर भारतीयांकडून मजेदार आतिषबाजी

India Air Strike: भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरअंतर्गंत जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला केला. 

22 एप्रिल - मोदी को बता देना, 7 मे- मोदीने बता दिया... सोशल मीडियावर भारतीयांकडून मजेदार आतिषबाजी

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसाच्या आतच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरअंतर्गंत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त  केले आहे. भारताने एअर स्ट्राइककरत मसूद अझहर याच्या मदरशावरदेखील हल्ला केला. भारताच्या या हल्ल्यात साधारण 90 दहशतवादी ठार झाल्याचे समजतंय. भारताच्या या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर अनेकांनी मीमच्या माध्यमातूनही लष्कराचे आभार मानले आहेत. 

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर बचावलेल्या पर्यटकांना मोदी को बता देना? असं म्हटलं होतं. त्यानंतर संपूर्ण देशात एकच संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी मागणी देशभरातून होत होती. 7 मे  रोजी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते मनोज तिवारी यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलं आहे की, 22 एप्रिल मोदी को बता देना? 07 मे मोदी ने बता दिया ##oprationsindoor

ऑपरेशन सिंदूरनंतर इंटरनेटवर अनेक रिअॅक्शन व्हायरल होत आहेत. या कारवाईमुळं भारतीयांना अभिमान वाटत आहे. 15 दिवसांनंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला आणि त्यावर भारतातील अनेक लोक खुश आहेत. सोशल मीडियावर लोक कशी प्रतिक्रिया देत आहेत. ते आपण जाणून घेऊयात. 

एकाने सोशल मीडियावर ट्विट केले आहे 'हॅपी दिवाली, पाकिस्तानी, इंडियन आर्मी जय हिंद,' असं म्हटलं आहे.  त्याचबरोबर भन्नाट ट्विट करत पाकिस्तानची थट्टा उडवली आहे. एका अन्य युजरने 'बता दिया और दिखा भी दिया', असं म्हटलं आहे. तर, एकाने म्हटलं आहे की, 'हॅपी दिवाली पाकिस्तान'

 

Read More