Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion: या चेहऱ्यात लपलेत 25 प्राणी! तुमचीही नजर तीक्ष्ण आहे तर दोन मिनिटात शोधून दाखवा

एक अतिशय कठीण ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका व्यक्तीचा चेहरा दिसत आहे. या चेहऱ्यात डझनभर प्राणी आहेत.

Optical Illusion: या चेहऱ्यात लपलेत 25 प्राणी! तुमचीही नजर तीक्ष्ण आहे तर दोन मिनिटात शोधून दाखवा

Optical Illusion:सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दडलेल्या गोष्टी आपल्याला शोधायच्या असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या मेंदुला चॅलेंज करतात आणि दडलेल्या गोष्टी शोधण्यास भाग पाडतात. असाच एक अतिशय कठीण ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका व्यक्तीचा चेहरा दिसत आहे. या चेहऱ्यात डझनभर प्राणी आहेत. चेहऱ्यात एकूण 25 प्राणी लपलेले आहेत. पण त्यांना शोधणे वाटतं तितकं सोपे नाही. सोशल मीडिया युजर्सच्या म्हणण्यानुसार एक प्रतिभावान व्यक्तीच हे सर्व प्राणी शोधू शकते.

ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या फोटोत तुम्ही दोन मिनिटांत सर्व 25 प्राणी शोधल्यास तुम्ही अव्वल 0.1% लोकांमध्ये असू शकता. हे पेंटिंग 16 व्या शतकातील इटालियन कलाकार ज्युसेप्पे आर्किमबोल्डोच्या शैलीमध्ये डिझाइन केले आहे.

कोणते प्राणी आहेत?

माणसाच्या डोक्याच्या वरच्या बाजूला गजराज स्वार आहे आणि त्याच्यासोबत शेपटीच्या बाजूला एक नाग आणि दुसऱ्या बाजूला एक विशाल पक्षी दिसेल. एका डोळ्यावर डॉल्फिन आणि दुसऱ्या डोळ्यावर सरडा आहे. एका डोळ्याच्या बुबुळाची जागा गोगलगायीने घेतली आहे. दुसऱ्या डोळ्याच्या बुबुळावर एक मेंढी असते. मानेची जागा कांगारू आणि अस्वलाने व्यापलेली आहे, तर ससा नाकावर बसला आहे आणि खाली गरुड आणि वाघ दिसत आहे. कानाच्या जागी टोळ आणि स्टार फिश आहे आणि दुसऱ्या कानावर कोल्हा बसला आहे. नाकाच्या सभोवतालच्या गालावर घोडा, कासव, व्हेल आणि चिंपांझी आहेत. हनुवटीने पंख पसरवत मोर दिसत आहे. बाकीचे प्राणी शोधणे आता तुम्हाला सोपे वाटेल अशी आशा आहे. तुम्हाला चेहरे दिसले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि त्यांना चेहरे शोधण्याचं चॅलेंज द्या.

Read More