Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion: या फोटोत लपलाय एक कुत्रा, फक्त 10 सेकंदात शोधा आणि पूर्ण करा चॅलेंज

Viral Brain Test: ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हंटलं की नेटकऱ्यांचा आवडीचा विरंगुळा. या फोटोत दडलेलं वस्तू शोधण्याचं एक वेगळंच चॅलेंज असतं. यामुळे फावला वेळ कापरासारखा उडून जातो.

Optical Illusion: या फोटोत लपलाय एक कुत्रा, फक्त 10 सेकंदात शोधा आणि पूर्ण करा चॅलेंज

Viral Brain Test: ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हंटलं की नेटकऱ्यांचा आवडीचा विरंगुळा. या फोटोत दडलेलं वस्तू शोधण्याचं एक वेगळंच चॅलेंज असतं. यामुळे फावला वेळ कापरासारखा उडून जातो. त्यामुळे ट्रेन, बस प्रवासात ऑप्टिकल इल्यूजन फोटोंना पसंती दिली जाते. असाच एक ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत दडलेला कुत्रा शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. पण चॅलेंज फक्त दहा सेकंदात पूर्ण करायचं आहे. त्यामुळे हे कोडं सोडवण्यापूर्वी मोबाईलमध्ये 10 सेकंदाचं टाईम सेट करा आणि शोध सुरु करा. या फोटोतील रंगसंगतीमुळे कुत्रा शोधणं कठीण आहे. पण तुम्ही नीट निरखून पाहिलं तर कुत्रा सहज तुमच्या नजरेस पडेल. तुम्हीही तुमच्या बुद्धीचा कस लावा आणि कुत्रा शोधा.

तुमच्या मोबाईलमध्ये सेट केलेलं टाइम संपलं असेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. यावरून तुम्हाला कुत्रा शोधणं सोपं होईल. कुत्रा झाडांच्या पानांमध्ये दडला आहे. आता एकाग्र मनाने पाहा आणि कुत्रा शोधून दाखवा. जर कुत्रा दिसला तर नो टेन्शन. पण तरी नाही सापडला तर खाली दिलेला फोटो पाहा.

fallbacks

हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. तुम्हीही हे कोडं स्वत: सोडवलं असेल तर तुमची खरंच तीक्ष्ण आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो शेअर करून इतरांना चॅलेंज देत आहेत. पाहा तुमचे मित्र हे कोडं 10 सेकंदात सोडवतात का?

Read More