Marathi News> भारत
Advertisement

सियाचीनमध्ये सैनिकांसाठी उभारणार ऑक्सिजन पुरवठा प्रकल्प

सुमेधा चिथडे यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या असून, त्यातून आलेले सुमारे सव्वा लाख रुपये त्यांनी या कामासाठी देणगी म्हणून दिले 

सियाचीनमध्ये सैनिकांसाठी उभारणार ऑक्सिजन पुरवठा प्रकल्प

सियाचीन : सियाचीन हा सर्वांत उंच बर्फाळ प्रदेश असून, सामरिकदृष्ट्याही तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. त्यामुळे त्या भागात तैनात असलेल्या जवानांची खूप मोठी परीक्षा असते. त्यासाठी सिर्फ फाउंडेशनच्या माध्यमातून सियाचीनमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन पुरवठा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केलाय. त्यासाठी किमान एक कोटी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी निधी जमवण्याची सुरुवात म्हणून सुमेधा चिथडे यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या असून, त्यातून आलेले सुमारे सव्वा लाख रुपये त्यांनी या कामासाठी देणगी म्हणून दिले आहे.

निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

आधी केले मग सांगितले अशी सुमेधा यांची विचारसरणी असल्याने त्यांनी स्वतःपासून ही सुरुवात केली त्यांनी या कामासाठी आर्थिक मदत स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या निर्णयाला अनेक लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दूरदूरहून लोक त्यांना जमेल तेवढी आर्थिक मदत देत आहेत. 

मात्र प्रकल्पासाठी लागणारा आकडा मोठा असल्यानं जितक्या लवकर हा निधी जमेल  तितक्या लवकर हा प्रकल्प उभा राहणार आहे.

सैनिकांप्रति असलेल्या प्रेमापोटी आणि कृतज्ञतेपोटी लवकरात लवकर निधि मिळावा यासाठी सिर्फ फाउंडेशन ठिकठिकाणी त्या देणगी देण्याची आणि सैनिकांबद्दलचे प्रसंग सांगत आहे. 

नाशिकच्या के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातही सिर्फ फाउंडेशनचा मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडलाय.

त्यामध्ये त्यांनी सैनिकांना मदत व्हावी यासाठी आवाहन केलय. तर यावेळी के के वाघ महाविद्यालयाने देखील मदत करण्याचे ठरविले आहे.  

Read More