Marathi News> भारत
Advertisement

Terror Attack : हातात शस्त्र नसताना दहशतवाद्यांशी लढला! 11 पर्यटकांना वाचवणारा 'नजाकत' आहे तरी कोण?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. 

Terror Attack : हातात शस्त्र नसताना दहशतवाद्यांशी लढला! 11 पर्यटकांना वाचवणारा 'नजाकत' आहे तरी कोण?

Pahalgam Attack:  जम्मु-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातुन बचावलेल्या पर्यटकांचे थरारक अनुभव ऐकून अंगावर काटा येत आहे. अशातच चर्चेत  आला आहे तो नजाकत अली नावाचा मुस्लिम तरुण. नजाकत अली याने   11 हिंदू पर्यटकांचे प्राण वाचवले आहेत. हातात एक शस्त्र नसताना त्याने दहशतवाद्यांशी लढा दिला. त्याचे साहस पाहून चकित व्हाल.

दहशतवादी हल्ल्यातून बाचवलेल्या पर्यटकांनी  नजाकत अली(Nazakat Ali) याचे आभार मानले आहेत. आपला जीव धोक्यात घालून  नजाकत अली याने पर्यटकांचे प्राण वाचवले आहेत. 23 एप्रिल रोजी काश्मिरमध्ये पर्यटकांवर हल्ला झाला.  'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून प्रसिद्ध असलेल्या पहलगामच्या बसरान व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवादी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत होते आणि त्यांच्यावर हल्ला करत होते. 

दरम्यान, पहलगाम येथील रहिवासी सय्यद आदिल हुसेन पर्यटकांना खेचरावर बसवून घेऊन जात होते. जेव्हा दहशतवाद्यांनी त्या पर्यटकांना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आदिल कोणत्याही शस्त्राशिवाय दहशतवाद्यांशी लढला.  यानंतर दहशतवाद्यांनी आदिलला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतरही तो दहशतवाद्यांशी  लढण्याचा प्रयत्न करत होता. अखेर  दहशतवाद्यांनी आदिलला गोळ्या झाडल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 

दुसरीकडे, आदिल हुसेनचा पुतण्या नजाकत अली देखील पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. नजाकत अली छत्तीसगडमधील चिरमिरी येथील एका कुटुंबाला दहशतवाद्यांपासून वाचवले. नजाकत याने दोन लहान मुलांना खांद्यावर घेत या  पर्यटकांना पायवाट मार्गे पार्किंग एरियात पोहचवले. यानंतर त्याने  वाहनातून या  सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे  हॉटेलपर्यंत पोहचवले. नजाकत अली यांने  एका कुटुंबासह 11 लोकांचे प्राण वाचवले आहेत.  

दहशवादी हिंदी की मुस्लिम अशा प्रकारे धर्म विचारुन पर्यकांनावर हल्ला करत होते. अशात सय्यद आदिल हुसेन आणि नजाकत अली यांनी धर्मापलीकडे जाऊन मानवतेच्या धर्माचे पालन करत हिंदू पर्यटकांचे प्राण वाचवले आहेत. 

 

Read More