Marathi News> भारत
Advertisement

पहलगाम घटनेवर पोस्टनंतर गायिकेविरोधात 11 कलमांखाली FIR; म्हणाली, 'हिंमत असेल तर...'

Neha Singh Rathore News:   लोक गायिका नेहा सिंग राठोडविरुद्ध उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय. 

पहलगाम घटनेवर पोस्टनंतर गायिकेविरोधात 11 कलमांखाली FIR; म्हणाली, 'हिंमत असेल तर...'

Neha Singh Rathore News: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक व्हिडिओ आणि विधाने प्रसिद्ध झाली. यातील काहींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. अशाच प्रकारे विधानामुळे लोक गायिका नेहा सिंग राठोडविरुद्ध उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय. अभय सिंग यांनी ही एफआयआर दाखल केलाय. एफआयआरनंतर नेहा सिंग राठोडने पुन्हा प्रतिक्रिया दिलीय. भारतीय दंड संहितेच्या 10 वेगवेगळ्या कलमांखाली राठोडविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. यासोबतच आयटी कायद्याचे एक कलमही त्यात जोडण्यात आलय. राठोडविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनस) 2023 चे कलम 196 (1) (a), कलम 196 (1) (b), कलम 197 (1) (a), कलम 197 (1) (b), कलम 197 (1) (c), कलम 197 (1) (d), कलम 353 (1) (c), कलम 353 (2), कलम 302, कलम 152 आणि सूचना प्रसारण (संशोधन) अधिनियम 2008  चे कलम 69a  अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाय.

एफआयआरनंतर राठोडची पहिली प्रतिक्रिया

गायिका नेहा राठोडने सोशल मीडिया साइट एक्सवर तिच्याविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआर संदर्भात प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले की, माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. तो दाखल करायला हवा. इतक्या मोठ्या लोकशाहीत एक साधी मुलगी प्रश्न कसे विचारू शकते! लोकशाहीचा आकार पहा! ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे भाऊ! धन्यवाद मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी', असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

'माझ्याकडे फक्त 519 रुपये आहेत...'

दुसऱ्या पोस्टमध्ये राठोडने लिहिलंय,  'लखनऊमध्ये माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. वकील मला मदत करू शकेल का? माझ्याकडे वकिलाची फी भरण्यासाठी पैसे नाहीत. माझ्या आयसीआयसीआय बँक खात्यात फक्त 519 रुपये आहेत. त्यापैकी मी तबला वादकाला 500 रुपये देईन आणि उद्या एक नवीन गाणे रेकॉर्ड करेन.'लोकगायिका नेहा सिंग राठोड आक्षेपार्ह पोस्ट करून आणि धर्म आणि जातीच्या लोकांना राष्ट्रीय अखंडतेवर प्रतिकूल परिणाम करण्यास उद्युक्त करतेय', असं एफआयआरमध्ये म्हटलंय. ही एफआयआर अभय सिंग यांनी लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात दाखल केलीय.

काय म्हणाली नेहा?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत नेहावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने आतापर्यंत काय केले आहे? तर माझ्याविरुद्ध एफआयआर. सरकार माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करून खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवू इच्छित आहे. हे समजणे इतके कठीण आहे का? जर तुमच्यात हिंमत असेल तर जा आणि दहशतवाद्यांचे डोके आणा. तुमच्या अपयशासाठी मला दोष देण्याची गरज नाही. लोकशाहीमध्ये जसे प्रत्येक मत महत्त्वाचे असते तसेच प्रत्येक प्रश्न देखील महत्त्वाचा असतो. मी प्रश्न विचारण्यात  सरकारला अडचण आहे. म्हणूनच ते मला प्रश्न विचारण्यापासून रोखू इच्छितात, असे नेहाने म्हटलंय. 

नेहाचा सरकारला प्रश्न

'खरा प्रश्न हा आहे की पहलगाम हल्ल्याच्या उत्तरात तुम्ही आतापर्यंत काय केले? तुम्ही किती दहशतवाद्यांचे डोके आणले? देशाने तुम्हाला पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाण्यासाठी निवडून दिले आहे का? काही उत्तर आहे का? खरं तर एकही नाही. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात फक्त नोटीस पाठवा, एफआयआर नोंदवा, तुमची नोकरी काढून घ्या. माझा अपमान करा. मला धमकावा. यालाच तुम्ही राजकारण म्हणता. जर हे राजकारण असेल तर हुकूमशाही म्हणजे काय?' असा प्रश्न नेहाने आपल्या पोस्टमधून विचारला.

Read More