Marathi News> भारत
Advertisement

Pahalgam Attack: निष्पापांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर दहशतवाद्यांनी केलं होतं निर्दयी सेलिब्रेशन; NIA रिपोर्टमधून संतापजनक खुलासा

Pahalgam Terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला. या जखमा आजही तितक्याच वेदनादायी ठरत असून, याच हल्ल्याशी संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.   

Pahalgam Attack: निष्पापांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर दहशतवाद्यांनी केलं होतं निर्दयी सेलिब्रेशन; NIA रिपोर्टमधून संतापजनक खुलासा

Pahalgam Terror attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम इथं 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या भीषण हल्ल्यानं सारा देश हादरला, एकूण 26 निष्पापांनी या हल्ल्यात जीव गमावला. ज्यानंतर भारतानं याच हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारे दहशतवादी तळ उध्वस्त केले. देशाच्या इतिहासातील पर्यटकांवर झालेल्या या सर्वात मोठ्या आणि भ्याड हल्ल्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती नव्यानं समोर आली आहे. 

पहलगाम हल्ल्यातील एका प्रत्यक्षदर्षीनं केंद्रीय तपास यंत्रणा (NIA)ला दिलेल्या माहितीत काही हादरवणारे खुलासे केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रत्यक्षदर्शीनं सांगितल्यानुसार हल्ला, बेछूट गोळीबार केल्यानंतर तीन दहशकवाद्यांनी हवेत चार राऊंड फायरिंग केली आणि हे क्रूर कृत्य साजरा केलं. 

प्रत्यक्षदर्शी ठरला 'स्टार प्रोटेक्टेड विटनेस'

तपास यंत्रणांना मिळालेल्या या अतिशय महत्त्वाच्या माहितीच्या आधारे सदर प्रत्यक्षदर्शीला 'स्टार प्रोटेक्टेड विटनेस' म्हणून घोषित करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार एनआयएला जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून या प्रत्यक्षदर्शीची माहिती मिळाली. हल्ला झाला तेव्हा ही व्यक्ती घटनास्थळी असून, त्याचा दहशतवाद्यांशी आमना-सामनासुद्धा झाला होता. 

एका तपास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार प्रतिष्ठित वृत्तसमुहाशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, 'दहशतवाद्यांनी त्यांना थांबवलं, कलमा म्हणून दाखवायला सांगितला. त्यानं स्थानिक काश्मिरी लहेजामध्ये कलमा वाचला. ज्यामुळं दहशतवाद्यांना संशय आला नाही आणि त्यांनी त्याला सोडलं. यानंतर लगेचच त्यांनी हवेत गोळ्यांचे चार राऊंड फायर केले' असं सांगितलं. ज्यानंतर तपास यंत्रणेला घटनास्थळावरून चार रिकामी काडतुसंसुद्धा सापडली. 

साक्षीदाराच्या माहितीनुसार त्यानं परवेज अहमद जोठार आणि बशीर अहमद नावाच्या दोन स्थानिकांनी दहशतवाद्यांचं सामान सांभाळतानाही पाहिलं होतं. काही वेळानंतरच दहशतवाद्यांनी हे सामान नेलं. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार या त्याच दोन व्यक्ती आहेत ज्यांना दहशतवाद्यांची मदत केल्याप्रकरणी यंत्रणांनी अटक केलं होतं. 

दरम्यान एनआयएला असाही संशय आहे की, या हल्ल्यामागे आणि दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या सुलेमान शाह या दहशतवाद्याची महत्त्वाची भूमिका असून, यापूर्वीच्या भुयारी मार्ग प्रकल्पात 7 मजुरांच्या हत्येतही त्याचा हात असल्याचं म्हटलं गेलं. 

Read More