Pakistani memes : भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करेल अशी परिस्थिती असताना तिकडं पाकिस्तानात मात्र आनंदी आनंद आहे. पाकिस्तानचे बेताल नेते तोंडाच्या वाफा सोडत आहेत. तर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्याच लष्कराची टिंगल करायला सुरुवात केली आहे. आता पाकिस्तान्यांनी एका गाडीचं रुपांतर फायटर जेटमध्ये केलं आहे. या फायटर जेटला खोट्या खोट्या मिसाईलही लावण्यात आल्या आहेत. त्यांची ती विमान गाडीही चालू होत नाही बरं का? पाकिस्तान्यांनी एक खोटं खोटं रडारही बनवलय बरं का? आता हे रडार फक्त त्यांच्या नेत्यांसारखं आवाजच करतं. कामाच्या नावानं मात्र बोंब आहे. हे रडार ज्यानं बनवलंय त्याच्या विनोद बुद्धीला सलाम आहे.
कारण रडार पाहताच तुम्ही पोट धरुन हसाल याची खात्री आहे. दुसऱ्या कलाकारानं तर भारताविरोधात लढण्यासाठी एका कारचं हेलिकॉप्टर तयार केलं आहे. आता ज्या पाकिस्तानला खऱ्याखुऱ्या विमानात टाकण्यासाठी इंधन नाही ते या बोगस हेलिकॉप्टरमध्ये इंधन कुठून भरणार? एका महाभागानं तर जगासाठी आऊटडेटेड झालेल्या आणि पाकिस्तानात वापरल्या जाणाऱ्या 70 सीसी बाईकचं विमानात रुपांतर केलं आहे. त्याचं विमान किती धावतं किंबहुना चालतं हे माहिती नाही पण त्यावर पाकिस्तानी झेंडे लावण्यास तो विसरला नाही.
एका फोटोत तर दोन तरुण पाकिस्तानी विमानांच्या खेळण्यांच्या प्रतिकृती घेऊन धावत असल्याचंही दिसतं आहे. आता जे आपल्याच सैन्याची टिंगलटवाळी करणार त्यांना युद्धाचं गांभीर्य काय कळणार? पाकिस्तानी जनता त्यांच्या राज्यकर्त्यांप्रमाणंच गंभीर नाहीये. म्हणतात ना यथा राजा तथा प्रजा. सोशल मीडियावर या पाकिस्तानी मिम्स आणि व्हिडिओजनं धुमाकूळ घातलाय. पाकिस्तानची ही हास्यजत्रा मनोरंजन करणारी असली तरी ती त्यांची मानसिकताही दाखवतेय. हे व्हिडिओ मनोरंजनात्मक असले तरी पाकिस्तानी जनतेची मानसिकता काय आहे याचा तो आरसा म्हणावा लागेल.