India Pakistan War: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे नष्ट करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर दोन्ही देशांमधील सीमेवर तणाव वाढलाय. भारताने पाकिस्तानचा हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडून त्याला योग्य उत्तर दिलंय. भारतीय सैन्याने इस्लामाबादसह अनेक शहरांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानची अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. पण पाकिस्तानी मीडिया भारताची ही कृती तिथल्या लोकांपासून लपवण्याचा प्रयत्न करतंय. पण आता पाकिस्तानच्या लोकांनीच ते उघड केलंय.
सध्या पाकिस्तानातील एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये ती भारताला पाकिस्तानी नेत्यांच्या घरांवर बॉम्ब टाकण्यास सांगतेय. असे केल्यास पाकिस्तानचे लोक तुम्हाला सलाम करतील. पाकिस्तानी मुलीचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये ती मुलगी म्हणतेय की, 'आमच्यासाठी हे कसले राजकारणी आहेत?' भारतातील लोकांनो, प्रथम तुम्ही आमच्या नेत्यांच्या घरांवर ड्रोनने हल्ला करावा. यासाठी पाकिस्तानचे लोक तुम्हाला सलाम करतील. ख्वाजा साहेबांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान सहन करावा लागतोय आणि ड्रोन आमच्या घरात घुसून आम्हाला मारतोय. भारत इस्लामाबाद, लाहोरपासून कराचीपर्यंत घरांमध्ये घुसून लोकांना मारतोय.', असेही ती आपल्या व्हिडीओत म्हणतेय.
#BreakingNews: पाक लड़की ने खोली नेताओं की पोल, कहा- 'पाक नेताओं के घरों पर हमला करें, घरों पर ड्रोन से हमला करे भारत'#OperationSindoor #AirStrike #Pakistan #IndiaPakistanWar #JammuKashmir #DroneAttacks #IndianNavy #ZeeNews@ShobhnaYadava pic.twitter.com/VcaUzkRIGE
— Zee News (@ZeeNews) May 9, 2025
#BreakingNews: लाहौर में रहने वाले शख्स का बयान- 'पाकिस्तानी मीडिया झूठ बोल रही है'#OperationSindoor #AirStrike #Pakistan #IndiaPakistanWar #JammuKashmir #DroneAttacks #IndianNavy #ZeeNews@theanupamajha @Anant_Tyagii pic.twitter.com/VkX4xBYnrU
— Zee News (@ZeeNews) May 9, 2025
पाकिस्तानच्या दुसऱ्या एका व्यक्तीने तिथल्या मीडियावर निशाणा साधलाय. 'पाकिस्तानी मीडिया खोटे बोलतेय. सध्या लाहोरवर हल्ला होतोय. तर पाकिस्तानी मीडिया खोटे बोलतेय. दर 2 मिनिटांनी क्षेपणास्त्रांचा आवाज येतोय. भारताने मोठा हल्ला केलाय', असे त्याने सांगितले.