Marathi News> भारत
Advertisement

आधार - पॅन जोडणीसाठी शेवटचे चार दिवस, अन्यथा पॅन कार्ड रद्द

आधार क्रमांक आणि पॅन कार्ड जोडणीची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. 

आधार - पॅन जोडणीसाठी शेवटचे चार दिवस, अन्यथा पॅन कार्ड रद्द

मुंबई : मोदी सरकारने आधार कार्ड  (Aadhar card) आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी (Pan-Aadhaar linking) आग्रही आहे. अनेकवेळा याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता केवळ तुम्ही आधार-पॅन जोडणी केली नसेल तर तुमच्या हातात चार दिवस बाकी आहेत. त्यानंतर तुमचे पॅन कार्ड (PAN) आपोआप रद्द होणार आहे. आधार क्रमांक आणि पॅन कार्ड जोडणीची मुदत ३१ डिसेंबरला संपत असून या मुदतीत ही जोडणी न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार आहे. 

fallbacks

आधार - पॅन जोडणीसाठी केंद्र सरकार आग्रही आहे. तसेच प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार ही कार्यवाही करण्यात येईल, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधार - पॅन जोडणी आवश्यक आहे.  आधार - पॅन जोडणीची मुदत सप्टेंबरअखेरीस संपली होती. परंतु ही मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आता येत्या मंगळवारी संपत आहे.

पॅन रद्द झाल्यानंतर काय?

दरम्यान, पॅन कार्ड रद्द झाल्यानंतर नागरिकांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे. पॅन रद्द झाले तर काय होणार, यााबाबत सरकारने अद्याप स्पष्ट केले नसले तरी अर्थ विश्लेषकांच्या मते  संबंधित नागरिकास प्राप्तिकर विवरणपत्र (आयटी रिटर्न फाईल्स) सादर करण्यात अडचण येऊ शकेल. तसेच, पॅन आवश्यक असणारे व्यवहारही पूर्ण करता येणार नाहीत. तसेच, त्याला नवीन कार्डसाठी अर्ज करावा लागेल. तसेच GST रिटर्न फाइल न केल्यास बँक खाते गोठवण्यात येणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. 

Read More