Marathi News> भारत
Advertisement

आधी कॉलर धरली नंतर एकामागे एक थोबाडीत मारल्या, भररस्त्यात तरुणीचा धिंगाणा

तरुणीनं भररस्तात आधी थोबडवलं आणि नंतर बॅटनं चोपलं, तुम्ही सांगा यात चूक कोणाची?

आधी कॉलर धरली नंतर एकामागे एक थोबाडीत मारल्या, भररस्त्यात तरुणीचा धिंगाणा

पानीपत: लखनऊतील महिलेनं कॅब ड्राव्हरसोबत केलेला गैरवर्तनाची घटना ताजी असताना तसाच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणीनं दोन जणांना बेदम मारहाण केली आहे. आधी कॉलर धरली आणि नंतर एक दोन नाही तर सर्वांसमोर एकामागे एक थोबाडीत लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

तरुणी आणि गाडी चालवणाऱ्या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला पोहोचला आणि चिडलेल्या तरुणीनं थेट गुंडगिरी करत गाडी चालकाची कॉलर पकडली. तिने एक नाही तर एकामागे एक करत थोबाडीत लगावल्या. हा संपूर्ण प्रकार सुरू असताना लोकांनी मध्यस्ती न करता बघ्याची भूमिका घेतली. हा संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तरुणीवर संताप व्यक्त केला जात आहे. या तरुणीविरोधात तातडीनं कारवाई करण्याची मागणी युझर्सनी लावून धरली आहे. कानशिलात मारून या तरुणीचा राग न गेल्यानं तिने क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ पानीपत इथल्या शेरा गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. लखनऊ नंतर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत असल्यानं अनेक युझर्सनी कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित युवकांचं मेडिकल आणि चौकशी केल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read More