Viral Video In India: चाचा विधायक है हमारे... हा डायलॉग फारच व्हायरल झाला आहे. यावर अनेक व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. मात्र, आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती टीटीईला भतीजा डीआरएम है हमारा, असं बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. यात एक प्रवासी ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवास करत असताना टीटीई त्याला तिकीट विचारतो. तेव्हा तो आपली वरपर्यंत ओळख असल्याचे सांगतो.
एक प्रवासी बिहारच्या ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याला बक्सर येथे जायचे असते. मात्र त्याच्याकडे कोणतेही रिझर्व्हेशन नव्हते. त्या व्यतिरिक्त तो रिझर्व्हेशन असलेल्या बोगीत जातो तसंच, ज्या व्यक्तीची सीट रिझर्व्ह आहे तिथं जावून बसतो. मात्र, त्यावरुन तो त्याला हटकतो आणि तिथे बसू नको म्हणून नकार देतो. त्यानंतर तो व्यक्ती त्याच्याशी वाद घालण्यास लागतो. तेव्हाच तिथे टीटीई येतो आणि नेमका गोंधळ काय हे जाणून घेतो.
तो व्यक्ती टीटीला सांगतो की मला बक्सरपर्यंत जायचं आहे. मात्र हा व्यक्ती मला तिथे बसून देत नाहीये. मी तुमचं बोलणं मनोज सिन्हा यांच्यासोबत करवून देतो. यावर टीटीईने उत्तर दिलं की त्यांच्या नंबर माझ्याजवळ देखील आहे. त्यावर तो बोलतो की रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बोलणं करवून देऊ का? त्याच्या या प्रश्नावर टीटीई वैतागून उत्तर देतो की आधी बाहेर जाऊया मग बोलूया.
चचा विधायक हैं की अपार सफलता के बाद पेश है। भतीजा DRM है
— अनुराग (@VnsAnuTi) December 14, 2024
आवारा पशुओं को खदेड़ना पड़ता है, लखेद दिए गए#viralvideo #StrayKids pic.twitter.com/OC2D6vGcp8
प्रवासी टीटीईचे बोलणं ऐकायला तयार नसतो. त्यावर कन्फर्म तिकिट नसतानाही प्रवासी ट्रेनमध्ये चढला आहे हे ऐकून टीटीई संतापतो व त्याला ट्रेनमधून बाहेर जाण्यास सांगतो. मात्र, प्रवासी त्याचं काहीच ऐकून घेत नाही वरुन त्याला सांगतो की, माझा भाचा डीआरएम आहे, मी त्याच्याशी बोलणं करुन देतो. त्यावर टीटीई म्हणतो की फोन करुन दे. टीटीईचे बोलणं ऐकून प्रवासी चपापतो आणि नंतर म्हणतो की, मला फक्त बक्सरपर्यंतच जायचं आहे. मला किती दंड द्यायचा आहे. त्यावर टीटीई त्याला कंपार्टमेंटमधून बाहेर काढतो आणि सांगतो की बाहेर चल आणि मग बोलू आपण, असं म्हणून त्याला बाहेर काढलं आहे.