Patanjali: योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांच्या प्रेरणेने व पंतजलीच्या शास्त्रज्ञांच्या शोधावर आधारित आयुर्वेदिक औषध संशोधनातून बनवलेले रेनोग्रिट या किडनी औषधावरील संशोधन जगप्रसिद्ध प्रकाशक नेचर पोर्टफोलिओच्या सायंटिफिक रिपोर्ट्स या संशोधन जर्नलमध्ये 2024 च्या टॉप 100 संशोधनांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
साइंटिफिक रिपोर्ट्सचा प्रभावी फॅक्टर 3.8 असून हा जगातील सर्वाधीक Cited जर्नल आहे. रीनोग्रिटवर प्रकाशित असलेला हे संशोधन पेपर 2568 लोकांनी डाउनलोड केला आहे. यावरून हे सिद्ध होते की आयुर्वेदिक औषधे केवळ रोग बरे करण्यात यशस्वी होत नाहीत तर शास्त्रज्ञांसाठी ही कुतूहलाचा विषय ठरला आहे . औषधी वनस्पतींपासून बनवलेले औषध कोणत्याही दुष्परिणामांशिवाय मोठ्या आजारांना देखील बरे करण्यास कसे सक्षम आहे. हा कुतूहलाचा विषय आहे.
पतंजलीने बनवलेले आयुर्वेदिक औषध रेनोग्रिट, अॅलोपॅथिक कर्करोगाच्या औषध सिस्प्लॅटिनमुळे होणाऱ्या किडनीवर प्रभावी आहे. त्याचबरोबर शिवाय मूत्रपिंडाच्या पेशींवरील ऑक्सिडेटिव्ह ताण देखील ठिक करते.
यावेळी आचार्य बालकृष्ण म्हणाले की, रेनोग्रिटचे हे यश हे आयुर्वेदाच्या वैज्ञानिक सत्यतेला जागतिक स्तरावर मान्यता मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर शाश्वत विज्ञानाची चाचणी घेतल्यास अभूतपूर्व परिणाम कसे साध्य होतात हे यावरून दिसून येते.
Disclaimer- Consumer connect initiative