Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक! गर्लफ्रेन्डसमोर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलवर तरूणाची आत्महत्या

व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलिंगवर गर्लफ्रेन्डसमोर एका १९ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

धक्कादायक! गर्लफ्रेन्डसमोर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलवर तरूणाची आत्महत्या

पाटणा : व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलिंगवर गर्लफ्रेन्डसमोर एका १९ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश कुमार असे या १९ वर्षीय तरूणाचे नाव आहे. त्याने देशीकट्ट्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. 

काय आहे प्रकार?

पाटण्यातील साईचकमधील ही घटना असून त्याने सोमवारी राहत्या घरीच आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करतेवेळी तो त्याच्या गर्लफ्रेण्डशी व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलवर बोलत होता. आकाशची गर्लफ्रेण्ड इयत्ता नववीत शिकणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गेल्यावर्षी परीक्षेत नापास झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून ९ एमएम देशीकट्टा आणि मोबाइल जप्त केला आहे.

काय म्हणाली आकाशची गर्लफ्रेन्ड?

आकाशच्या गर्लफ्रेन्डने पोलिसांना सांगितले की, ‘आकाश व्हिडीओ कॉलवर बोलत होता. अचानक त्याने पिस्तुल बाहेर काढलं. मी त्याला लगेचच पिस्तुल बाजूला करायला सांगितली. पण त्याने ऎकलं नाही. 

हे होतं कारण?

आकाशचे वडील त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते. आकाशच्या गर्लफ्रेण्डच्या वडिलांचे गुन्हेगारी विश्वाशी संबंध असल्याने आकाशच्या वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे आकाश नाराज होता. मुलीच्या घरूनही या लग्नाला विरोध होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

शेवटचं काय बोलला आकाश?

मीडिया रिपोर्टनुसार, आकाश आणि त्याच्या गर्लफ्रेन्डमध्ये घरी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलणं झालं. त्यानंतर तिला शेवटचं बघायचं, असं सांगून व्हिडीओ कॉल लावला. आणि त्याने तिच्या समोरच स्वत:वर गोळी झाडली. घटनेनंतर आकाशच्या गर्लफ्रेण्डने आकाशचा चुलत भाऊ चंदन कुमारला फोन केला. त्यानंतर त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Read More