Marathi News> भारत
Advertisement

Petrol-Diesel Price Today:पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार? जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत. (Petrol-Diesel Rate) आज लागोपाठ 16 व्या दिवशी दर स्थिर राहिले.

Petrol-Diesel Price Today:पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत. (Petrol-Diesel Rate) आज लागोपाठ 16 व्या दिवशी दर स्थिर राहिले. तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) च्या नुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 107.26 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे.

जीएसटी काउंसिलच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलला GST च्या कक्षेत न आणण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्तींना पुन्हा झटका लागला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढण्याच्या शक्यता आहेत. देशात 5 सप्टेंबर पासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

शहर  - पेट्रोल दर - डिझेल दर

बंगळुरु  104.70      94.04

भोपाळ 109.63 97.43

पटना    103.79      94.55

लखनऊ 98.30       89.02

चंडीगड 97.40      88.35

रांची      96.21        93.57

Read More