Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या आधारेच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित होतात. कच्च्या तेलाच्या किमती 2021 नंतर प्रथमच 3 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले आहे. च्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या - असून, गेल्या चार दिवसांत यात घसरण झाली आहे. त्यामुळं लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.
'सीआरईए' अहवालानुसार, डिसेंबर 2021 नंतर प्रथमच कच्च्या तेलाचे दर इतक्या खाली आले आहेत. 2025 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती आणखी घसरून 60 डॉलर प्रति बॅरलवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकारचा देशाबाहेर जाणारा पैसा मोठ्या प्रमाणात वाचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आज कच्च्या तेलाच्या किंमती 70 डॉलरपेक्षा कमी झाल्या आहेत. ब्रेंट क्रुड आज 69.76 डॉलर प्रति बॅरल इतके आहे. तर WTI क्रूड 66.77 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास सरकारी तेल कंपन्यांनी आज सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत.
ओपेकवर अधिक तेल उत्पादन करण्यासाठी ट्रम्प यांचा दबाव. एप्रिलपासून ओपेक कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविणार. अमेरिकाही कच्च्या तेलाचे अधिक उत्पादन वाढवणार आहे. चीन आणि इतर देशांनीही व्यापार युद्धात उडी घेतल्याचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर होत आहे. भारतातील काही रिफायनरींनी 3 रशियन कूडचे पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनात रूपांतर केले आणि ते युरोप आणि इतर जी-७देशांमध्ये निर्यात केले. युद्धानंतर रशियाने इंधनाच्या निर्यातीतून एकूण ८३५ अब्ज युरो कमावले आहेत.