Marathi News> भारत
Advertisement

आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरात वाढ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रविवारी कोणतीही वाढ झाली नव्हती, मात्र सोमवारी पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली आहे.

आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरात वाढ

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रविवारी एक दिवस कोणतीही वाढ झाली नाही. मात्र आज सोमवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 5 पैशांची तर डिझेलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीत पेट्रोलचा दर 80.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.53 रुपये प्रति लीटर इतका झाला आहे. 

कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होऊन देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसतेय. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा सामान्यांना मोठा फटका बसत आहे. रविवारी तब्बल 21 दिवसांनंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. मात्र त्याआधी सलग 20 दिवस इंधन दरवाढ सुरु होती. शनिवारपर्यंत तीन आठवड्यांमध्ये पेट्रोलच्या दरात 9.12 रुपये तर डिझेल दरात 11.1 रुपयांची वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

 

Read More