Marathi News> भारत
Advertisement

दोन आठवड्यांनंतर पेट्रोल-डीझेल महागलं, जाणून घ्या आजचे दर...

शहरांमध्ये पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत जवळपास ६ पैशांनी वाढ झालीय

दोन आठवड्यांनंतर पेट्रोल-डीझेल महागलं, जाणून घ्या आजचे दर...

नवी दिल्ली : सलग दोन दिवस इंधनांचे दर घटल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डीझेलच्या दरांत वाढ दिसून आलीय. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारीपासून आत्तापर्यंत किंमत स्थिर राहिल्याचं किंवा कमी झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यानतंर आज मात्र पहिल्यांदाच इंधनांच्या किंमतीत वाढ दिसून आलीय. शहरांमध्ये पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत जवळपास ६ पैशांनी वाढ झालीय.

मुंबईत पेट्रोलची किंमत ५ पैशांनी वाढलीय. आज मुंबईत पेट्रोलचे दर ७५.९७ रुपये आहे. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत ५ पैशांनी वाढून ७०.३३ रुपयांवर पोहचलीय. कोलकत्यात पेट्रोलचा आजचा दर आहे ७२.४४ रुपये तर चेन्नईमध्ये ७३ रुपये प्रति लीटर पेट्रोल उपलब्ध आहे.

शहराचं नाव पेट्रोल / लीटर डीझेल / लीटर
दिल्ली ₹ ७०.३३ ₹ ६५.६२
मुंबई ₹ ७५.९७ ₹ ६८.७१
कोलकाता ₹ ७२.४४ ₹ ६७.४०
चेन्नई ₹ ७३.०० ₹ ६९.३२
नोएडा ₹ ७०.२५ ₹ ६४.८५
गुरुग्राम ₹ ७१.२६ ₹ ६५.४४

डीझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लीटर डीझेलची किंमत ६ पैशांनी वाढून ६५.६२ रुपये, मुंबईत ६८.७१ रुपये, कोलकत्यात ६७.४० रुपये तर चेन्नईमध्ये ७ पैशांनी वाढून ६९.३२ रुपये प्रती लीटर आहे.

 
Read More