Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोल-डिझेल दरांसंदर्भात खुशखबर? तेल कंपन्यांकडून आले नवे दर

Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून 10 जुलैसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून हे दर लागू होतात. 

पेट्रोल-डिझेल दरांसंदर्भात खुशखबर? तेल कंपन्यांकडून आले नवे दर

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलच्या वाढच्या किंमची वाढल्या की त्याचा परिणाम आपल्या खिशांवर दिसतो. आजकाल अनेकजण वाहनाचा उपयोग करतात. तसेच आपल्याला रोजसाठी लागणारा भाजीपालाही वाहतुकीने आपल्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. दरम्यान पेट्रोल डिझेल संदर्भात कंपन्यांनी नवे दर अपडेट केले आहेत. 

तेल कंपन्यांकडून 10 जुलैसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून हे दर लागू होतात. या अपडेटनुसार पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झालेला पहायला मिळत नाही. काही दिवसांपुर्वीच पेट्रोल डिझेलच्या किंमती थोड्या कमी झाल्या होत्या. केंद्रीय तेल कंपन्यांनी मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. निवडणुकीच्या आधी पेट्रोल-डिझेलच्या दरात 2-2 रुपयांनी कपात करण्यात आली होती. यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणता विशेष बदल झाला नाही. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गींयांनाही कोणता विशेष दिलासा मिळालेला नाही.

प्रमुख शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीमध्ये पेट्रोल 94.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 87.62 रुपये प्रति लीटर मिळतय. मुंबईत पेट्रोलसाठी हा दर 103.94 रुपये प्रति लीटर तर डिझेलसाठी 89.97 रुपये प्रति लीटर इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 103.94 प्रति लीटर तर डिझेल 90.76 रुपये प्रती लीटरने मिळतंय. चेन्नईमध्ये पेट्रोल 100.85 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.44 रुपये प्रति लीटरने मिळतंय. 

ओमसीने जारी करते दर 

देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जारी करतात. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या आपल्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जारी करतात. त्यामुळे घरबसल्या देखील तुम्हाला पेट्रोल डिझेलचे दर तपासता येतात. 

असे तपासा दर 

तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती माहिती करुन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तेल मार्केटिंग कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. किंवा एक एसएमएस पाठवावा लागेल. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP सोबत शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर पाठवावा लागेल, तर भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांना RSP लिहून 9223112222 नंबर वर एसएमएस पाठवावा लागेल.

Read More