Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोलच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या आजचे दर

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलचे भाव पुन्हा वाढले आहेत.

पेट्रोलच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलचे भाव पुन्हा वाढले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी गुरुवारी दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोलच्या किंमती वाढवल्या. या दोन्ही शहरात पेट्रोलची किंमत ८ पैशांनी वाढल्या. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १२ पैसे तर चेन्नईमध्ये नऊ पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. तर सलग सहाव्या दिवसानंतरही डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकातामध्ये पेट्रोलच्या किंमती क्रमश: ७५.७७ रुपये, ७८.९६ रुपये आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ७८.९६ रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल ७६.१८ रुपये प्रति लीटर आहे. 

याआधी चार दिवसांच्या सलग भाववाढीनंतर बुधवारी पेट्रोलचे भाव कमी झाले. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणते बदल केले नाही. 

Read More