Marathi News> भारत
Advertisement

200 कोटींचा मालक परंतु खटारा स्कूटरने का करायचा प्रवास? अशी होती पियुष जैनची लाईफस्टाइल

पियुष जैन यांच्याकडून आतापर्यंत 194 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यापैकी 177 कोटी 45 ​​लाख रुपये कानपूरमधून वसूल करण्यात आले आहेत. तर कन्नौजमधील घरातून 17 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

200 कोटींचा मालक परंतु खटारा स्कूटरने का करायचा प्रवास? अशी होती पियुष जैनची लाईफस्टाइल

नवी दिल्ली : कानपूरच्या करचुकव्या पियुष जैन या व्यावसायिकाबाबत आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. या व्यावसायिकापासून आयकर विभागाने आतापर्यंत 200 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती अगदी साध्या घरात राहते. आणि आजही जुन्या स्कूटरवर फिरते. म्हणजेच त्याच्याकडे गाडीही नाही. मग त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून?.. वडिलोपार्जित सोनं मोठ्या प्रमाणात मिळाल्याचं त्यानं सांगितलं. 

एवढी कोट्यावधींची रोकड मिळाल्यानंतर या व्यक्तीच्या शेजाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पियुष जैन यांची जीवनशैली पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल की, कोट्यावधींचा पैसा असलेली ही व्यक्ती इतकी साधं आयुष्य कसे जगत होती.

पियुष जैनच्या घरातून सापडले 23 किलो सोनं 

पियुष जैन यांनी त्यांच्या घराच्या हॉलमध्ये पाण्याची टाकी बांधली होती. आणि तपास केला असता या टाकीखाली तळघर आढळून आले. टाकीचे आवरण काढले असता सर्वाध आधी चंदनाच्या तेलाचा ड्रम आढळून आला.

हा ड्रम काढला असता त्याखाली 17 कोटींची रोकड सापडली. आणि त्याखाली 23 किलो सोन्याच्या विटा सापडल्या. हे सर्व पियुष जैन यांच्या घराच्या तळघरात गोण्यांमध्ये ठेवण्यात आले होते.

पियुष जैनकडून आतापर्यंत 194 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. पियुष जैन यांच्याकडून आतापर्यंत 194 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यापैकी 177 कोटी 45 ​​लाख रुपये कानपूरमधून वसूल करण्यात आले आहेत.

तर कन्नौजमधील घरातून 17 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या विटांची एकूण किंमतही 11 कोटी एवढी आहे. याशिवाय 600 किलो चंदन तेलाचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

पियुष जैन स्कूटरने करायचे प्रवास

पियुष जैन यांच्याकडे सुमारे 200 कोटी रुपये मिळाले. एवढ्या पैशात उत्तर प्रदेशातील 93 लाख लोकांना मोफत लस देता आली असती. पियुष जैनकडून आतापर्यंत 194 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पियुष जैनने भलेही भरपूर संपत्ती कमावली असेल. पण त्यांनी नेहमी साधे आयुष्य जगत होता. तो नेहमीच एका जुन्या स्कूटरने प्रवास करायचा. कन्नौजच्या अरुंद गल्लीत, पीयुषचे घर होते. उशिरा का होईना.

पण तो नेहमी स्कूटरवरून फिरायचा. तसचे पियुष साधे कपडे परिधान करीत असे.

शेजारच्यांशी कमी संवाद

पियुषने कधीही कोणाला कळू दिले नाही की त्याच्याकडे खूप पैसा आहे. पियुष जैन यांना न ओळखण्याची इतरही अनेक कारणे होती. एक म्हणजे त्याचा आजूबाजूच्या लोकांशी फार कमी संवाद होता.

तो शेजारच्यांशी फार कमी बोलायचा. तो उशिरा उठायचा आणि स्कूटरने थेट आपल्या कामाला जायचा. याशिवाय त्यांनी घरही असे बांधले होते की, ज्यातून आजूबाजूच्यांना घरात डोकावायला फारसा वाव नव्हता.

त्यामुळे रद्दीसारख्या पडलेल्या या पैशाचा काय उपयोग असा प्रश्न सहजच तुमच्या मनात निर्माण झाला नसेल तर नवलंच?.

Read More