Marathi News> भारत
Advertisement

गॅस सबसिडीवरुन पंतप्रधान मोदींचा अजब दावा

 मोदींच्या या विधानामुळं विरोधकांना आयतं कोलित

गॅस सबसिडीवरुन पंतप्रधान मोदींचा अजब दावा

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरून गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन केल्यावर सव्वाशे कोटी कुटुंबांनी सबसिडी सोडल्याचा अजब दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला आहे. दिल्लीत एम्सच्या चार नव्या प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. त्यावेळी केलेल्या भाषणात मोदी बोलत होते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सव्वाशे कोटी कुटुंबं असतीलच कशी, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बोलण्याच्या ओघात अनावधानं हा उल्लेख झाला असण्याची शक्यता असली तरी मोदींच्या या विधानामुळं विरोधकांना आयतं कोलित मिळण्याची शक्यता आहे.

Read More