Marathi News> भारत
Advertisement

मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांचा रस्ता अडवणार; कोण देतंय इशारा ?

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवल्याची जबाबदारी घेणाऱ्या ... 

मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांचा रस्ता अडवणार; कोण देतंय इशारा ?

नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांवर देशाचा प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. त्याच्याशीच संबंधित महत्त्वाची बातमी सध्या समोर आली आहे. कारण, प्रजासत्ताक दिनी एका संघटनेकडून पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवणार असल्याचा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. (PM Modi)

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवल्याची जबाबदारी घेणाऱ्या शीख फॅार जस्टीस .या संघटनेनं आता सुप्रीम कोर्टातील वकीलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रजासत्ताक दिनी राजपथावर जाऊ देणार नाही, असा इशारा देत मोदींना इंडिया गेटवर पोहोचण्यापासून रोखणार असल्याचं या संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये गेले असता पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवल्याची घटना घडली होती. 

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही अतिशय धक्कादायक बाब होती. सदर घटनेची जबाबदारी शीख फॅार जस्टीसनंच घेतली होती. 

आता म्हणे त्यांच्याकडून वकीलांनाही दिली धमकी देण्यात येत आहे. आम्ही काही वकीलांची यादी तयार करणार आहोत, असं म्हणत मोदी सरकारची बाजू घेऊ नका या शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. 

Read More