Marathi News> भारत
Advertisement

PM Narendra Modi यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन; Sabarmati Ashram पासून सुरू होणार पदयात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करणार आहेत.

PM Narendra Modi यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन; Sabarmati Ashram पासून सुरू होणार पदयात्रा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi To Inaugurate Amrit Mahotsav)शुक्रवारी साबरमती आश्रम येथून सुरू होणाऱ्या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील अनेक कार्यक्रमांचेही ते उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या  माहितीनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवशी निगडीत अनेक सांस्कृतिक आणि डिजिटल कार्यक्रमांचे  उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी साबरमती आश्रमातील लोकांना संबोधित करणार आहेत. 

यावेळी गुजरातचे  राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी साबरमती आश्रम ते नवसारी येथील दांडीपर्यंतच्या 81 जणांच्या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. साधारण 387 किलोमीटरचे अंतर पार करण्यास 25 दिवस लागणार आहेत.  

Read More